Prakash Mahajan : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीचे दोनही भाग प्रसारीत असून यावर भाजप नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडूनही जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलाखतीवर जोरदार टीका केली आहे.
आपल्या आजारपणाबद्दल मुलाखतीमध्ये ठाकरे हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्व करत असून आजारी असतांना कुठे खाजवले तर काय करावे,असे बोलत आहेत. मात्र, ते तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी चार माणसं ठेवून जिथे पाहिजे तिथे खाजवून घ्यायला पहिजे होते,अश्या शब्दात महाजन यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी काल (ता.२७ जुलै) एका खासगा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. (Prakash Mahajan & Uddhav Thackeray Latest News)
प्रकाश महाजन म्हणाले, महाराष्ट्राचा एक माजी मुख्यमंत्री आपल्या आजारपणाबद्द्ल सहानुभूती मिळवतो. ते मुलाखतीत म्हणतात की, सगळ सुन्न झालं होत, हातपाय हलत नव्हते. मग मला काळजी होती की माझ्या अंगावर डास बसला तर त्याला कस हाणू किंवा त्यांला कसे खाजवू पण मला सांगा तुम्ही त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्यासाठी चार माणसं ठेवा आणि त्यांच्याकडून जिथे पाहिजे तिथे खाजवून घ्या. ही काय मुलाखतीत सांगण्याची गोष्ट आहे का? लोकांना काय याचे देणेघेणे आहे, अश्या शब्दात महाजन यांनी ठाकरेंवर खोचक टीका केली.
महाजन पुढे म्हणाले की, यावरूनच आठवलं की की माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर हे आजारी असतांना त्यांनी कश्या अवस्थेत कसा अर्थसंकल्प मांडला होता. याचीही त्यांनी ठाकरेंना आठवण करून दिली तसेच अनेक नेत्यांना असे आजार आहेत. मात्र ते काम करतात. मात्र, ठाकरेंना कसे खाजवावं हा जर प्रश्न पडत असेल तर राज्यातील जनतेने डोक खाजवावं, असा प्रश्न पडला आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.
आज जे राज्यात घडलं यास कोण जबाबदार वाटत या प्रश्नावर महाजन म्हणाले की, त्यावेळी बाळासाहेब, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात एक चांगली केमेस्ट्री होती. ते काही वाद झाला तर एकमेकांमध्ये मिटवून घेत होते. त्यातही प्रमोदजी कधी कधी चिडायचे मात्र गोपीनाथराव मनात ठेवायचे. त्यांच्या युतीच एक सुत्र होत ज्याचें जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं असायचं. मात्र त्यांनी युती तुटू दिली नाही. तसेच यावेळी बोलतांना त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा बाळासाहेबांनी जेंव्हा राजीनामा घेतला त्यावेळचा एक किस्सांही सांगितला. ते म्हणाले की, तेव्हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला होता मात्र, बाळासाहेबांनी प्रमोदजींना फोन करून बोलावलं होत, असा त्यांचा एकमेकांवर विश्वास आणि जिव्हाळा होता. मात्र आता बाळासाहेब आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हे सेना-भाजपमध्ये राहिल नसल्याचेही महाजनांनी सांगितले.
दरम्यान, महाजन यांनी ठाकरे यांच्या मुलाखतीवर जोरदार टीका केली आणि त्यांची मुलाखत बघून मला महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध असलेल्या काळू-बाळू नावाच्या तमाशाची आठवण झाल्याची टीका केली. तसेच, उद्धव ठाकरे यांनी बाप-दाद्यांची कमावलेली इस्टेट गमावली अन् आता पडक्या वाड्यात बसून मुलाखत देत आहेत, अशा खोचक शब्दात ठाकरेंना सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.