
Marathwada News : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोठा लढा उभारला होता. या त्यांच्या लढ्याची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दखल घेतली गेली.पण त्यांच्या याचवेळी जरांगेंनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करतानाच राजयात नवा संघर्ष पेटला. ओबीसी समाजातील नेत्यांकडून जरांगेंच्या या मागणीविरोधात मोठं आंदोलन उभं केलं. त्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत ओबीसी समाजातलं नेतृत्व पुढं आणलं.आता याच हाकेंना ओबीसी समाजाकडून मोठं गिफ्ट मिळाले आहे.
ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत परभणीत मंगळवारी (ता.27) आंदोलक लक्ष्मण हाके यांना थेट फॉर्च्युनर ही आलिशान गाडीच गिफ्ट केली आहे. या गिफ्टची मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. परभणी तालुक्यातील राणीसावरगाव येथील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी हाकेंना महागडी अशी फॉर्च्यूनर लेजेंडर कार भेट म्हणून दिली आहे.
लक्ष्मण हाकेंनी या भेटीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना परभणी आणि नांदेडच्या सीमेवर ज्याठिकाणी माझी गाडी फोडण्यात आल्याचं सांगितलं. त्याचवेळी फॉर्च्युनर ही गाडी भेट देण्याचं ठरलं होतं. यावेळी त्यांनी समाजाप्रती ऋण व्यक्त करतानाच ओबीसी (OBC) समाजासाठी सुरू केलेलं हे असंच अजून जोमानं पुढे घेऊन जाणार असल्याचं म्हटलं.
यावेळी आपल्याला एसीमध्ये राहायची सवय नसून समाजाच्या कार्यासाठी ही गाडी देण्यात आल्याचं हाके म्हणाले. तसेच,त्याचा वापर आपण समाजाच्या कल्याणासाठी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यावेळीही ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ज्यादिवशी मनोज जरांगे ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही भूमिका घेऊन मुंबईकडे निघणार, त्याचदिवशी ओबीसी बांधवही माळेगाव येथून मुंबईकडे लाँगमार्च काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
छगन भुजबळांसारख्या ओबीसी चेहऱ्याला,जेव्हा की राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा राज्यभरात उभा राहिला होता, तेव्हा डावलणे ही मोठी चूक होती. भुजबळ संपूर्ण राज्यात ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी एल्गार करत होते.
मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे, आंदोलनं, निदर्शने तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावसाठी छगन भुजबळांचे प्रयत्न यातून त्यांना ओबीसींची प्रचंड सहानुभूती मिळाली. परंतु धनंजय मुंडेंसारख्या तरूणाकडे ओबीसींचे नेतृत्व यावे या हेतूने तयारीला लागलेल्या अजित पवारांनी कोणाचे काही ऐकले नाही. पण आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनं हाकेंना निश्चितच मोठं पाठबळ मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.