Prakash Ambedkar Reaction on Budget : सरकारने दिलेली माहिती संशयास्पद; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Interim Budget 2024 : हे सरकार केवळ ज्ञान देत आहे पण भारतीय युवा, गरिब आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Mumbai : देशात काही महिन्यांत लोकसभा निवडणूक होणार असून त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट लोकसभेत सादर केले. महिला तसेच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भाजप नेते हा सर्वसामान्यांना दिलासा देणारे बजेट असल्याचा दावा करत आहे. तर, विरोधक मात्र सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Prakash Ambedkar Reaction on Budget )

Prakash Ambedkar
Ravindra Dhangekar Reaction on Budget : 'हे तर 'गाजर' बजेट, काँग्रेसच्या योजना चोरल्या'; आमदाराने केला मोठा दावा

'हे सरकार केवळ ज्ञान देत आहे पण भारतीय युवा, गरिब आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली. सरासरी उत्पन्न 50 टक्के वाढल्याचे बजेटमध्ये म्हटले आहे. मात्र या वाढीचा माहिती स्त्रोत काय आहे ?' अशी विचारणा करत पीएम किसानसाठी दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती ही संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'व्हायब्रंट गुजरात'ची पोलखोल...

जर अर्थव्यवस्था चांगली असेल तर मागील 9 वर्षात 12 लाख 88 हजार 293 अतिश्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला ? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच 'व्हायब्रंट गुजरात' मधील 7 लाख 25 हजार लोकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला ? असा प्रश्न उपस्थित करून आंबेडकर यांनी बजेटमध्ये केलेल्या विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विरोधकांकडून टीका

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांनी देखील बजेटवर टीका केली आहे. काँग्रेसच्या काही योजना चोरून त्यांचा समावेश बजेटमध्ये केला असल्याचा दावा आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. तर, खासदार इम्तियाज जलील यांनी अर्थमंत्री बजेट मांडत असताना त्यांचे राज्यमंत्री हसत होते, असे म्हणत हे बजेट त्यांचेच मंत्री गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे.

Prakash Ambedkar
Hingoli Loksabha Election 2024 : हिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस एवढी आग्रही का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com