
Dharashiv News : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अर्धी दिवाळी संपली तरी महायुती सरकारकडून दिली जाणारी मदत पोहचली नाही, त्यामुळे राज्य सरकारविषयी शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात असताना आता याविषयी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर राज्य सरकारच्या कारभारावर कडाडले आहेत.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहचली नसल्याने ओमराजे निंबाळकर म्हणाले, 'राज्य सरकारने आता आणखी एक जीआर काढावा अन् दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा सरकारने केली होती. गावोगावी अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बँकेने आडमुठेपणा केल्यामुळे होल्ड लागल्याने अडचण आहे, अशा शब्दात खासदार ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimabalkar ) यांनी संताप व्यक्त केला आहे.
गावोगावात अजूनही प्रशासकीय यंत्रणेकडून सोपस्कार पूर्ण करण्याचे काम सुरूच आहे. हे सरकारी सोपस्कार शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी आडवे येत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बँकेने आडमुठेपणा करीत होल्ड लागल्याने अडचण होत आहे. जी घोषणा सरकारने केली होती. दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही, अन हा प्रकार दुर्दैवी असल्याचे ओमराजे म्हणाले.
बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आतापर्यंत मी तीन कलेक्टर व मंत्रालयातील सात सचिवांना ठोकले, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे एका वाद निर्माण झाला आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ओमराजे म्हणाले, 'प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असते. ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याकडुन जनतेला न्याय मिळत नाही. त्यावेळी जनतेचा उद्रेक होतो. त्यावेळी नागरिक प्रत्येक गोष्टीला लोकप्रतिनिधीला जबाबदार धरत असतात. त्यांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधीला दाद मागत असतात. अधिकाऱ्यांना कधी जनतेत जावे लागत नाही अथवा नागरिकांकडे जाऊन मत मागावे लागत नाही. दुसरीकडे लोकप्रतिनिधीला मात्र, या अडचणीना तोंड द्यावे लागते. पाच वर्षानंतर ज्यावेळेस फेरनिवड होते. त्यावेळेस त्याच्या संपूर्ण कार्याचे मूल्यमापन करूनच निवडून देत असतात.'
'लोकांच्या प्रति लोकप्रतिनिधीने संवेदनशील असणे ही त्यांची जबाबदारी असते. दुसरीकडे मदत करीत असताना कुठला अधिकारी जर जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असेल तर शेवटी लोकप्रतिनिधीच्या रागाचा उद्रेक होणारच. शेवटी तोही माणूसच आहे. एकादी गोष्ट ऐकून घेऊन समजून घेऊन मार्ग काढणे आवश्यक असते. मार्ग काढत नसतील तर शेवटी कुठला मार्ग लोकप्रतिनिधीच्या हाती राहतो. त्या गोष्टीचे मी समर्थन करणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या जागी स्वतःला ठेऊन त्या माणसाची व्यथा समजून घेऊन सोडवणे गरजेचे आहे, असेही ओमराजे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.