Ambadas Danve News : अंबादास दानवेंचा परभणी दौरा पक्ष बळकटीसाठी की खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराचा अंदाज घेण्यासाठी?

Political News : मुंबईत ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिलेले खासदार संजय जाधव हे आजही नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला गैरहजर होते.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिंदेच्या शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसापासून राज्यभरात होत आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आल्यानंतर खऱ्या अर्थाने या चर्चेला जोर चढला होता. मराठवाड्यातील परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चाही या निमित्ताने होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बळकटीसाठी हा दौरा असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. मात्र हा दौरा खरंच पक्षाच्या बळकटीसाठी होता, की खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराचा अंदाज घेण्यासाठी? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबईत ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिलेले खासदार संजय जाधव हे आजही नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला गैरहजर होते.

Ambadas Danve
Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरे प्लॅन बदलणार, मराठवाड्यात भाजपला रोखण्यासाठी मोठी खेळी? विधान परिषदेसाठी लढवय्या नेता मैदानात उतरवणार

2024 मध्ये झालेल्या लोकसभेत महायुतीच्या विरोधात लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीने परभणीची जागा जिंकली होती. पक्ष फुटीनंतर ठाकरेंसोबत खंबीरपणे, निष्ठेने उभे राहिल्याचे फळ म्हणून ठाकरे यांनी जाधव यांना तिसऱ्यांदा परभणीतून उमेदवारी दिली होती. मतदारांनीही त्यांना निवडून देत विश्वास दाखवला. परंतु गेल्या काही दिवसांपासून संजय जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असे संकेत मिळत आहेत.

Ambadas Danve
Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचा खासदार अमित शहांना भेटला!

नुकतीच राज्यसभेवर निवड झालेले खासदार रामराव वडकुते यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभात भाजपच्या मंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, सुरेश वरपुडकर आणि स्वतः खासदार वडकुते यांनी संजय जाधव यांच्या महायुतीतील प्रवेशाबद्दल सूचक संदेश दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला.

Ambadas Danve
Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचा खासदार अमित शहांना भेटला!

परभणी, पाथरी, जिंतूर आणि गंगाखेड या विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेत त्यांना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बळकटीसाठी विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या. संघटना मजबूत करण्यासाठी प्रभागनिहाय रचना करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागात निष्ठावंत शिवसैनिकांना संधी दिली गेली पाहिजे. 'संघटना ही कार्यकर्त्यांच्या बळावर चालते, त्यामुळे शिवसैनिकांचा सन्मान आणि सहभाग वाढवणे गरजेचे आहे', अशी भूमिका दानवे यांनी मांडली.

Ambadas Danve
Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरे प्लॅन बदलणार, मराठवाड्यात भाजपला रोखण्यासाठी मोठी खेळी? विधान परिषदेसाठी लढवय्या नेता मैदानात उतरवणार

विशेष म्हणजे या बैठकीला खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) हे अपेक्षेप्रमाणे गैरहजर होते. आमदार राहुल पाटील, परभणी संपर्कप्रमुख प्रदीप कुमार खोपडे, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रवींद्र धर्मे, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर व महापौर सय्यद इकबाल यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. संघटनात्मक बळकटीसाठी ही बैठक असल्याचे सांगीतले जात असले तरी खासदार संजय जाधव यांनी पक्षांतर केले तर पक्ष किती डॅमेज होईल, त्यांच्यासोबत कोणते पदाधिकारी, कार्यकर्ते जाऊ शकतात? याचा अंदाज अंबादास दानवे यांनी घेतल्याचे समजते.

Ambadas Danve
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंचा परभणीचा 'वाघ'; शिंदेच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com