Sanjay Shirsat News : पालकमंत्री कुठे आहेत? टीका होताच संजय शिरसाट गॅस, पेट्रोल टंचाईवर बोलले!

Sambhajinagar gas shortage News : ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा हा कंपन्याच्या अरेरावीचा परिणाम असल्याचे सांगत एनओसी नसलेल्या पंपांना सील ठोकण्याचे आदेश देत पालकमंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
Sanjay Shirsat Political Statement News
Sanjay Shirsat Political Statement NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस, पेट्रोलसाठी रांगा लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसत आहे. सर्वसामान्यांचे हाल होत असताना पालकमंत्री संजय शिरसाट कुठे आहेत? अस प्रश्न विचारला जात होता. विरोधकांनी टीकाही सुरू केली, अखेर रविवारी शिरसाट यांनी या सगळ्या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देतानाच ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा हा कंपन्याच्या अरेरावीचा परिणाम असल्याचे सांगत एनओसी नसलेल्या पंपांना सील ठोकण्याचे आदेश देत पालकमंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

शहरामध्ये जो एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे, तो कंपन्यांच्या अरेरावीचा परिणाम आहे. मी पुरवठा अधिकाऱ्यांना आत्ताच सूचना दिल्या आहेत. प्रशासकीय नियंत्रण नसल्याने गॅसची खरेदी केली जात नाहीये. 'गॅस उपलब्ध आहे, मात्र आम्ही तो खरेदी करणार नाही' ही कंपन्यांची उर्मट भाषा असल्याने रिक्षाचालकांना नाहक त्रास होत आहे. याप्रकरणी मी तातडीने निर्देश दिले आहेत. ज्या ऑटो एलपीजी गॅस पंपांकडे एनओसी नाही, त्यांचे पंप तातडीने सील करा. या कारवाईनंतरच हे चालक ताळ्यावर येतील. हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांचे घर कसे चालणार? गेल्या पाच दिवसांपासून गॅस मिळत नसल्याने हे कडक निर्देश दिले आहेत. प्रशासन यावर ठोस कारवाई करेल, अशी मला अपेक्षा आहे.

Sanjay Shirsat Political Statement News
Maharashtra Political Live Updates: कोकणातील रत्नागिरीला भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

माझ्या शहरातही गॅसच्या रांगेत उभे असताना एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. रिक्षाचालक आधीच अडचणीत आहेत, त्यांनी स्वतःचे पोट कसे भरायचे? ऑटो एलपीजी गॅस पुरवठादारांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Sanjay Shirsat Political Statement News
Sambhaji Nagar Water Issue: पाण्याचं राजकारण अखेर संपलं! संभाजीनगरात लवकरच घराघरातून ऐकून येणार नळाच्या पाण्याचा खळखळाट

भुमरेंच्या चालकावर गुन्हा, शिरसाटांची सावध भूमिका

शिवसेनेचे (Shivsena) खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाविरुद्ध फसवणुक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात शिरसाट यांना प्रश्न केला असता या प्रकरणाची मला अद्याप कल्पना नाही, मी याबद्दल सविस्तर माहिती घेईल, असे सांगत अधिकचे बोलणे टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय सध्या लांबणीवर पडला आहे. अजित पवार यांच्या पक्षातील काही लोक विलीनीकरणाच्या विरोधात आहेत, तर काही बाजूने. यावर अंतिम तोडगा कसा निघेल हे आताच सांगता येणार नाही, मात्र हा विषय तूर्तास लांबणीवर पडणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Sanjay Shirsat Political Statement News
Nashik Water Issue : आमचं पाणी चोरलं जातय, डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन भाजप नगरसेविका थेट सभागृहात पोहोचल्या

भोंदू खरात प्रकरणावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवर शिरसाट यांनी खरात प्रकरणामध्ये सर्व यंत्रणा काम करत आहे. सीडीआर आणि व्हिडिओसमोर आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे, कारण अनेक महिलांवर अत्याचार झाले आहेत. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. यात कोणताही अधिकारी, नेता किंवा व्यापारी अडकला असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

Sanjay Shirsat Political Statement News
Harshada Shirsat: शिवसेनेच्या नगरसेवकांना राहिलं नाही भान, तलवार नाचवत केला उन्माद! एकावर गुन्हा पण शिरसाटांच्या मुलीवर कारवाई नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन तुम्ही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्या गोष्टीला सामोरे जायला तयार आहोत. केवळ फोटो आला म्हणून आक्षेप घेणे चुकीचे आहे. या प्रकरणात जो कोणी गुन्हेगार असेल, त्याला जेलमध्ये टाकलेच पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat Political Statement News
BJP News : महापालिकेत भाजपच्या सभापतीकडून एमआयएमची 'कोंडी'; निधी हवा असेल तर छत्रपती संभाजीगरचा उल्लेख असलेले पत्रच हवे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com