Pankaja Munde: पालकमंत्री असूनही मराठा आंदोलनात ज्या गावात पाय ठेवला नाही, तेच अंतरवाली सराटी पंकजा मुंडेंनी घेतलं दत्तक!

Pankaja Munde adopt Antarwali Sarati village: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र राहिलेले अंतरवाली सराटी गाव दत्तक घेण्याची घोषणा केली.
Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Pankaja Munde, Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathvada politics : राज्यातील मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेले आणि देश पातळीवर गाजलेले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे याच अंतरवाली सराटीतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्यभरात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष भडकला होता. यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन बहीण भावांवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून टीका केली गेली होती.

परंतु नजीकच्या काळात मनोज जरांगे पाटील यांची मंत्री पंकजा मुंडे यांच्या बद्दलची भूमिका मावळ झाली होती. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे समर्थपणे पुढे नेत आहेत. गोरगरीब वंजारी समाजाला न्याय देऊ शकतात ओबीसींना न्याय देऊ शकतात, असे कौतुक जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. धनंजय मुंडे यांना टोकाचा विरोध तर पंकजा मुंडे यांना पाठिंबा असे काही विषय चित्र सध्या निर्माण झाले आहे.

Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Amravati Politics: शिक्षकांना प्रचारात उतरवलं तर खैर नाही! शिक्षणसंस्थेवर बावनकुळे संतापले; SIT चौकशीसह मान्यता रद्द करण्याचा इशारा

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटी पायाही न ठेवणाऱ्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आता थेट दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे गावच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी त्यांनी या संदर्भातली घोषणा केली दुष्काळी परिस्थितीत गाव दत्तक अभियान अंतर्गत आपण जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गाव सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतल्या असून आचारसंहितेनंतर पुढील महिन्यात त्या गावात भेट देणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

Pankaja Munde, Manoj Jarange Patil
Maharashtra Retired Employees: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनवाढीला ब्रेक! वित्त विभागाचा मोठा आदेश

मराठा आरक्षण आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि चळवळीचे केंद्र राहिलेल्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेत पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये निर्माण झालेला दुरावा काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com