Parbhani BJP News : पंकजा मुंडेंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट; आमदार बोर्डीकरांचा रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या..

Parabhani Political News : जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील एका अल्पवयीन तरुणाने त्याच्या इन्सटाग्रामवरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. हा प्रकार समजताच जिंतूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
Pankja munde, meghna bordikar
Pankja munde, meghna bordikar sarkarnama

विनोद पाचपिले

Jintur News : मराठा आरक्षणावरून राज्यात सर्वत्र ओबीसीविरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसत आहे. जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील एका अल्पवयीन तरुणाने त्याच्या इन्सटाग्रामवरून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरले.

हा प्रकार समजताच जिंतूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप (Bjp) आमदार मेघना बोर्डीकर स्वत: शनिवारी रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन बसल्या होत्या.

सोमवारी (ता.24) जिंतूर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबद्दल चुकीची व आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या वेळी एकाने इन्सटाग्रामवर बीडच्या सिंहासनावर बसणार कोण? अशी पोस्ट टाकली होती.

या पोस्टखाली जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील एका तरुणाने त्याच्या इन्सटाग्रामवरून अपशब्द वापरत कॉमेंट केली. ही कॉमेंट वाचताच पंकजा मुंडे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सर्वपक्षीय समाजाच्या नागरिकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्थानकासमोर गर्दी केली.

Pankja munde, meghna bordikar
Abdul Sattar - Sandipan Bhumre : भुमरे-सत्तार यांच्यात तिसरा कोण ? पालकमंत्री पदावरून टोलेबाजी..

याची माहिती कळताच आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. आरोपीला तात्काळ अटकेची मागणी करत त्यांनी तिथे ठाण मांडले. पोलिसांनी अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर मेघना बोर्डीकर यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्थानकामधून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी बोरी, बामणी, चारठाणा, परभणी येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. रात्री अडीच वाजता संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर व सर्व कार्यकर्ते तिथून निघून गेले. संबंधित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर जिंतूरमधील वातावरण आता निवळले आहे.

Pankja munde, meghna bordikar
Lok Sabha Session News : नव्या मराठी खासदारांनी पहिल्याच दिवशी दिल्ली गाजवली;'है तयार हम' म्हणत वज्रमूठ आवळली !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com