Pankaja Munde News: मुंडे भगिनींच्या मनात नेमकं तर चाललंय तरी काय..?बीडमधील सावरकर गौरव यात्रेला दांडी

Munde Sister's Absence in Savarkar Gaurav Yatra at Beed: ...यापूर्वी फडणवीस, बावनकुळेंच्या कार्यक्रमांना गैरहजर!
Pankaja Munde | Pritam Munde
Pankaja Munde | Pritam MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे. पक्षाकडूनही त्यांना वारंवार डावललं जात असल्याचंही बोललं जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. तसेच विनायक मेंटेंच्या बीड येथील कार्यक्रमालाही मुंडे भगिनी अनुपस्थित राहिल्या होत्या. याचीही मोठी चर्चा झाली होती.

याचदरम्यान पंकजा मुंडे यांनी आपण पक्षावर नसल्याचं सातत्यानं सांगितलं असलं तरी त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण भाजप आणि शिवसेनेच्या बीडमधील सावरकर गौरव यात्रेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे गैरहजर राहिल्या.

Pankaja Munde | Pritam Munde
Shinde-Fadanvis Politics: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात; राज्य सरकारचा मोठा निर्णय...

बीडमध्ये भाजप-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात स्थानिक नेते मंडळींची उपस्थिती होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे या दोघी भगिनींची सावरकर गौरव यात्रेतील अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करत वाजत-गाजत, फटाक्यांच्या आताषबाजी करत निघालेल्या मोटरसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

बीड जिल्ह्यातील सावरकर यात्रेत खासदार,आमदार,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सावरकर प्रेमी नागरिकांनी मोठया संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची यात्रेत अनुपस्थित राहिल्या.

Pankaja Munde | Pritam Munde
Nitin Gadkari Threat Case: गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट; चौकशीत धक्कादायक खुलासे, केंद्रीय तपास यंत्रणेकडे..

यापूर्वी फडणवीस, बावनकुळेंच्या कार्यक्रमांना दांडी...

पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर कार्यक्रमांनाही गैरहजर राहिल्या होत्या. दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या संघटनेच्या वतीने व्यसनमुक्ती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच पक्षाच्या महत्वाच्या कार्यक्रमांनाही मुंडे गैरहजर राहिल्या असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

...पण मला कोणी संपवू शकतं नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. तसेच मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे. मात्र, मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत असं विधान केलं होतं.

Pankaja Munde | Pritam Munde
Mahabaleshwar News : बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई; संभाला रिसार्ट सील

नड्डांच्या सभेत बोलण्यासाठी फक्त दोनच मिनिटं वेळ...

औरंगाबाद येथे सभा पार पडली. परंतु, या सभेला भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि त्यांच्या भगिणी खासदार प्रीतम मुंडे यांना निमंत्रण न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आहे. निमंत्रण नसतानाही पंकजा मुंडे कार्यक्रमाला गेल्या. परंतु, त्यांना व्यासपीठावर बोलण्यासाठी फक्त दोनच मिनीट वेळ देण्यात आला. या दोन मिनिटांमध्येही पंकजा मुंडे यांनी अवघ्या एका मिनिटात आपले भाषण संपवले. त्यामुळे त्या खरच नाराज आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु, आपण नाराज नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

'' राजकारण हा काटेरी रस्ता आहे...''

उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, मीसुद्धा राजकारणात अनेक टीकांना सामोरी गेले आहे. राजकारण हा काटेरी रस्ता आहे, इथे काटेरी सिंहासन आहे, काटेरी मुकूट आहे. इथे केवळ फुलंच वाट्याला येणार नाहीत, तर टीकाही वाटयाला येईल. अनेकदा खालच्या पातळीवरची टीका वाट्याला येईल.

Pankaja Munde | Pritam Munde
AAP Jalandhar News: काँग्रेसच्या बालेकिल्याला AAP ने पाडले खिंडार; माजी आमदाराला 'आप' कडून तिकीट

मला विश्वास आहे की, देवेंद्र फडणवीस या टीकेमुळे व्यथित होणार नाहीत. ते त्यांचं काम व्यवस्थित करतील. या सर्व गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत. कोणीही असं करू नये असं वाटतं, परंतु ते होत राहणार आहे असंही मुंडे म्हणाल्या होत्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com