Mahabaleshwar News : बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई; संभाला रिसार्ट सील

Satara Collector महाबळेश्वर तालुक्यात मोठयाप्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे वाढली. या गंभीर प्रश्नाची दखल साताराचे जिल्हाधिकारी यांनी घेतली.
Sambhala Resort, Mahabaleshwar
Sambhala Resort, Mahabaleshwarsarkarnama

-अभिजित खुरासणे

Mahabaleshwar News : सातारचे जिल्हाधिकारी Satara Collector रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील यांनी विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर Illegal constructions कारवाईस आज सुरूवात केली. पहिल्याच दिवशी महसूल विभागाने मेटगुताड येथील डोंगर उतारावर धोकादायक पध्दतीने बांधलेल्या संभाला रिसार्टवर प्रथम पाणी व वीज पुरवठा बंद करून इमारतीला सील ठोकले.

गेली अनेक वर्षे महाबळेश्वर तालुक्यातील विनापरवाना बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर होता. बांधकाम पाडण्याच्या कारवाईचा खर्च पाहता केवळ कागदोपत्री आदेश निघत होते. पंरतु प्रत्यक्ष कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे तालुक्यात मोठया प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे वाढली. या गंभीर प्रश्नाची दखल साताराचे जिल्हाधिकारी यांनी घेतली.

मागील आठवडयात त्यांनी अशा बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणीसाठी तालुक्यातील सर्वच विभागांनी तयारी सुरू केली. तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी अशा कारवाईचा मास्टर प्लॅन तयार केला व आज या प्लॅननुसार कारवाई करण्यास सुरूवात केली.

Sambhala Resort, Mahabaleshwar
महाबळेश्वर सुशोभीकरण; व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्री काढणार सुवर्णमध्य

मेटुताड येथे डोंगर उतारवार बेकायदेशीर विनापरवाना धोकादायक इमारत उभी केली. ही इमारत बेकायदेशीर असुन देखील महावितरणने या इमारतीला वीज दिली तर ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरू केला. तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पारवे यांच्या नेतृत्वाखाली महसुल, महावितरण, ग्रामपंचायत, पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. प्रथम या इमतारतीचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

Sambhala Resort, Mahabaleshwar
Satara BJP : फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे

त्या नंतर महसुल विभागाने बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या खोल्यांना एक एक करीत सील ठोकले. सर्वात शेवटी या हाॅटेलचे स्वागत कक्षाला सील ठोकुन त्यावर महसुल विभागाच्या कारवाईचा फलक लावण्यात आला आहे. या धडक कारवाई मुळे महाबळेश्वर तालुक्यात एकच खळबळ माजली असुन बेकायदेशीर बांधकाम कारणारांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Sambhala Resort, Mahabaleshwar
Satara : शंभूराज देसाईंच्या आई म्हणाल्या, त्याला मी Collector करणार होते, पण....

आज एकुण चार इमारतींना सील ठोकण्यात येणार होते. पंरतु कारवाई पथकातील अपुरे कर्मचारी व कारवाईसाठी लागणारा वेळ पाहता पथकातील कर्मचारी यांची संख्या वाढविली पाहिजे. वाई, खंडाळा, जावली या तीन तालुक्यातील महसुल विभागातील कर्मचारी यांचा कारवाई पथकात समावेश करून आज सुरू झालेल्या बेकायदेशीर बांधकाम विरोधातील कारवाईला वेग दिला जाणार आहे.

Sambhala Resort, Mahabaleshwar
Phaltan News : नीरा-देवघरसाठी लवकरच निधी मिळणार : खासदार निंबाळकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com