Pankaja Munde : दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंनी सांगितले अंतरवाली सराटी दत्तक घेण्याचे कारण?

Dasara Melava: पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात अंतरवाली सराटी गाव दत्तक घेण्यामागील कारण स्पष्ट केले. जातीपातीच्या भिंती पाडून गावाचा बीडप्रमाणे विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Dashara melava: मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गाव दत्तक घेण्याची घोषणा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. “जातीपातीच्या आणि जन्माच्या भिंती आपल्याला पाडून टाकायच्या आहेत,” असे सांगत अंतरवाली सराटीचा विकास बीड जिल्ह्यातील गावांप्रमाणे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला. ज्या जालना जिल्ह्याचे पालकत्व पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. त्याच जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून मराठा आरक्षणाचा लढा लढला गेला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी नुकताच मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू आणि लढ्याची कर्मभूमी असलेल्या अंतरवाली सराटी या गावालाच दत्तक घेण्याची घोषणा केली.

भगवान भक्ती गडावर झालेल्या आजच्या दसरा मेळाव्यात अंतरवाली सराटी दत्तक घेण्यामागचे कारण पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. जातीपातीच्या आणि जन्माच्या भिंती आपल्याला पाडून टाकायच्या आहेत, त्यासाठीच आपण अंतरवाली सराटी गाव दत्तक घेतले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावावर जितके प्रेम मी केले, ज्याप्रकारे या भागातला विकास केला तसाच विकास आपण अंतरवाली सराटीत करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

बीडच्या श्रीक्षेत्र भगवान भक्तीगडावर झालेला यंदाचा दसरा मेळावा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा ठरला. दुष्काळी परिस्थितीच्या सावटाखाली मेळावा होणार का, अशी शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणातून प्रत्युत्तर दिले. एखाद्या कुत्र्याला दगड मारला तर तो केकाटत जाईल, पण मधाच्या पोळ्याला दगड मारला तर काय होतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. हे माझं मधाचं पोळ आहे असा इशारा देत पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या विरोधात रणशिंग फुंकले.

राज्यात आणि जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना हा मेळावा कसा होणार, असा सवाल उपस्थित करणाऱ्यांवर टीका करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझे सगळे वाघ उन्हातले आणि डोंगरातले आहेत, या वाघांना ऊन कधीच लागत नाही. तुम्ही माझी खरी शक्ती आहात आणि गोपीनाथ मुंडे परिवार तुमचे उपकार कधीही विसरू शकत नाही. एका क्षणात निर्णय घेऊन भगवान भक्तीगड स्थापन केल्याचे सांगत ही लेकीची ताकद आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

Pankaja Munde
Dhananjay Munde : फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत धनंजय मुंडेंचा कोणाला इशारा?

स्वतःचे घर देश जाळून आंदोलन करणारे तरुण नकोत..

आजच्या तरुण पिढीवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, फ्रान्स, पॅरिसमधील आंदोलने किंवा रशिया-इराणच्या युद्धाची आपण रिल्स बघतो. पण, आपल्याला असा देश किंवा अशी तरुण पिढी नको, जिच्या मनात देशभक्ती नाही. तरुणांच्या रक्तात देशभक्तीचे टॉनिक भिनवण्याची आज गरज आहे. स्वतःचे घर आणि देश जाळून आंदोलन करणारे तरुण नकोत, तर गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे देश पुढे नेणारे सैनिक हवेत, असे त्या म्हणाल्या. तुम्ही जेन झी आहात आणि नेतृत्व हे मुद्याने केले पाहिजे, गुद्याने नाही, असा सल्ला त्यांनी दिला.

Pankaja Munde
Manoj jarangi Patil : मनोज जरांगे पाटील यांना खिंडीत गाठण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला, नारायण गडावरील मेळाव्याला तुफान गर्दी

दुष्काळावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दुष्काळ कधीही जात-पात किंवा श्रीमंत-गरीब बघत नाही, तहान सगळ्यांनाच सारखीच लागते. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीत आपल्याला माणसा-माणसांमधील आणि जाती-धर्माच्या भिंती मनगटाने मोडून टाकायच्या आहेत. याच भूमिकेतून आपण जालन्यातील आंतरवली गाव दत्तक घेत असून तिथे आपल्या बीड जिल्ह्यासारखाच विकास करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com