Dhananjay Munde : फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत धनंजय मुंडेंचा कोणाला इशारा?

Beed Politics news: भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीतून विरोधकांना सूचक इशारा दिला. ‘वाऱ्याची दिशा बदलतेय’ म्हणत त्यांनी राजकीय कमबॅकचे संकेत दिल्याची चर्चा रंगली.
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Dashara melava: 'बहोत मैफिले बैठी मुझे बदनाम करने के लिए, मगर उन्हे क्या पता हवा का रुख बदल रहा है', अशा शायराना अंदाजात आमदार धनंजय मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यातून आपल्या विरोधकांना इशारा दिला. फार सहन केलं, पण आजही तुम्हाला वाटतं ते बोलणार नाही, असे सांगत काही गोष्टींचा हिशोब नियतीच करत असते, असे धनंजय मुंडे म्हणाले.

बीड व राज्याच्या राजकारणात गेल्या दोन अडीच वर्षांपासून संघर्ष करत असलेल्या धनंजय मुंडे यांनी आज भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. फार सहन केलं, यामुळेच आपलं वाटूळं झालं; 'काही मैफिली माझ्या तबाहीसाठी बसल्यात, पण हवा रुख बदलतीये', असे म्हणत धनंजय मुंडे यांनी राजकारणातील आपल्या जोरदार कमबॅकचे संकेत दिल्याची चर्चा त्यांच्या भाषणानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

बीडमधील श्रीक्षेत्र भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात आजी-माजी राजकीय समिकरणांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या विधानांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. मागील काही काळापासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले आणि पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला सलग दुसऱ्यांदा उपस्थित राहिलेले धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीत मनातील खदखद आणि राजकीय वेदना भरमंचावर बोलून दाखवली.

भाषणासाठी उभे ठाकल्यानंतर उपस्थितांच्या जोरदार घोषणाबाजीवर मिश्कील टिप्पणी करत त्यांनी यामुळेच आपले वाटूळे झाले रे… असे म्हटले, तेव्हा उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्वतोपरी मदत पोहोचवली जाईल, अशी ग्वाही दिली.

Dhananjay Munde
Manoj jarangi Patil : मनोज जरांगे पाटील यांना खिंडीत गाठण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला, नारायण गडावरील मेळाव्याला तुफान गर्दी

गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी या जिल्ह्यात विकासाची गंगा आणली, आपणही ऊसतोड कामगारांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र हे सर्व करूनही शेवटी आम्हालाच टीकेचे धनी व्हावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मागच्या दसरा मेळाव्यात बोललो आणि आता बोललो, बाकी कुठेही व्यक्त झालो नाही. पण आता फार सहन केले असे सांगत त्यांनी मनातील सल व्यक्त केली. ​

Dhananjay Munde
Sanjay Raut Albania post : संजय राऊतांच्या अल्बानिया पोस्टवरून सोमय्यांचा पलटवार; संजय निषादांच्या विधानाने चर्चेला नवे वळण

पुढे राजकीय अस्तित्वावर भाष्य करताना त्यांनी अत्यंत सूचक शब्दांत शेरो-शायरीचा आधार घेतला. तुम्ही कितीही बोला, पण मी बोलणार नाही. काही मैफिली माझ्या तबाहीसाठी बसल्या आहेत, पण त्यांना अजून ठाऊक नाही की आता वाऱ्याची दिशा बदलत आहे असा, सूचक इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

अखेरीस, महायुतीचा आमदार म्हणून आपण आणि पंकजाताई नेहमी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना धीर दिला. एकूणच आपल्या छोटेखानी भाषणातून धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com