Pankaja Munde News : जालन्यातील ओबीसींच्या मेळाव्यात फोटो, तरी अनुपस्थित का ? पंकजा मुंडेंनी दिलं 'हे' उत्तर

Maratha Vs OBC : 'ही' माझी आजपर्यंतची ओळख राहिली आहे...
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Parli News : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष दिवसागणिक अधिक टोकदार होत चालला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर ओबीसी समाजाने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला.

या मेळाव्यात फोटो झळकल्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे या उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. पण त्या अनुपस्थित राहिल्या. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांनीच ओबीसी मेळाव्याला अनुपस्थित राहण्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde
Jayakwadi Water Issue : आता विखेंच्या 'पद्मश्री' कारखान्यानेही 'जायकवाडी' प्रश्नी घेतली न्यायालयीन उडी!

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जालना येथील ओबीसी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या मेळाव्याला अनुपस्थित राहण्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.मुंडे म्हणाल्या,आत्तापर्यंत ओबीसींचे अनेक मेळावे वेगवेगळ्या पक्षांनी घेतले आहेत.भाजपने देखील यापूर्वी ओबीसींचे मेळावे घेतले आहेत.पण हा मेळाव्यात माझा फोटो लागल्यामुळे त्याला यावं,अशी समाजातील नागरिकांची इच्छा होती.

मात्र, हा सर्वपक्षीय मेळावा असल्यामुळे पक्षाकडून कोणी जावे,याबाबतचा निर्णय राज्यातील पक्षाच्या टीमने घेतला.त्यात भाजपकडून आशिष देशमुख,देवयानी फरांदे हे या कार्यक्रमाला गेले होते, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला.

जरांगें पाटलांचा 'तो' दावा, मुंडे म्हणाल्या...

मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी पंकजा मुंडे यांच्या जालन्यातील ओबीसी समाजाच्या मेळाव्यातील अनुपस्थितीवरुन मोठा दावा केला होता. त्यात त्यांनी पंकजा मुंडे यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणूनच त्या ओबीसी मेळाव्याला गेल्या नाहीत, असं विधान केले होते. त्यावर मुंडे म्हणाल्या, “मी जरांगेंचं वक्तव्य ऐकलं नाही.

पण आता माझ्याकडे त्यांचा एक व्हिडीओ आला आहे.ते असं म्हणाले की, पंकजा मुंडे यांना गरिबांची जाण आहे. हे एक साधं वाक्य असून गरिबांची जाण असल्याशिवाय राजकारणात काम करण्यात अर्थ नाही. म्हणून मला गरिबांची नक्कीच जाण आहे. मराठा समाजाचे गरीब असतील, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सहानुभूती आणि जाणीव आहे. त्याचबरोबर ओबीसी जे जन्माने मागास आहेत त्यांच्याबद्दल प्रेम, जाणीव आणि चिंता असल्याचेही पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Pankaja Munde
MLA Prajakt Tanpure : महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या वाढली ? आमदार तनपुरेंनी थेट पंतप्रधानांकडे केली 'ही' विनंती !

'ही' माझी आजपर्यंतची ओळख...

माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी बहुजन नेता आहे. त्याची पुरस्कर्ती आहे.माझी सुरुवातीपासूनची भूमिका बघितली तर मराठा आणि ओबीसी समाजातील वाद, संघर्ष कमी होण्याकडे माझा जास्त कल आहे. कारण समाजातील गरीब आणि सामान्य माणूस यामध्ये पिसत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्टसुद्धा केलीय. त्यामुळे मला तिथे वेगळं काही व्यक्त करण्याची गरज नसल्याचेही मुंडे म्हणाल्या.

मराठा, ओबीसी वादावर मार्ग निघेल...

जालना येथील छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) तडाखेबंद भाषणावर प्रतिक्रिया देतानाच त्यांनी राज्यात सुरु असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादावर निश्चितपणे मार्ग निघेल असा विश्वासही व्यक्त केला. त्या म्हणाल्या,जालन्यातील ओबीसी मेळाव्यातील पिच ही छगन भुजबळ यांची होती.त्यांनी फूल बॅटिंग केलेली मी पाहिली. खूप दिवसांनी एक चांगलं भाषण बघायला मिळालं.त्यांच्या वयाचा,अनुभवाचा अंदाज घेता आणि मराठा समाजाच्या अस्वस्थेचा अंदाज घेता भविष्यात या प्रश्नावर मधला मार्ग निघेल याचा मला विश्वास आहे”, असंही त्या मुंडेंनी सांगितलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Pankaja Munde
Anjali Damania News : अंजली दमानियांचा खळबळजनक दावा; म्हणाल्या," फडणवीसांनीच भुजबळांना जरांगे यांच्याविरोधात ..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com