Beed Lok Sabha Election: प्रचारासाठी पंकजाताईंच्या पायाला भिंगरी, तर आघाडीचा उमेदवार ठरेना

Pankaja Munde News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटीचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. तरी दुसरीकडे त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण हे निश्चित झालेलं नाही.
Dr. Jyoti Mete, Bajrang Sonwane, Pankaja Munde
Dr. Jyoti Mete, Bajrang Sonwane, Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Lok Sabha Election 2024: बीड लोकसभा निवडणूक पुढच्या टप्प्यात असली तरी भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर झालेल्या पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत बीडची जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार? बजरंग सोनवणे की डॉ. ज्योती मेटे (Bajrang Sonwane, Dr. Jyoti Mete) याबाबतच्या चर्चा अद्याप सुरू आहेत.

बीड (Beed) लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Dr. Pritam Munde) यांची उमेदवारी टाळून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पहिल्याच यादीत पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले. उमेदवारी जाहीर होताच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंधरा दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातून जिल्ह्यात एन्ट्री केली. त्यानंतर बीड, गेवराई होमपिच असलेले परळी आणि पुन्हा केज, माजलगाव तर त्यानंतर उर्वरित बीड मतदारसंघातील महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे त्यांनी गेवराईत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांचीही भेट घेतली आहे. पंकजा मुंडे यांचा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटींचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. तरी दुसरीकडे त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी कोणाला हेच निश्चित झालेलं नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून डॉ. नरेंद्र काळे, माजी मंत्री जयसिंग गायकवाड, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. ईश्वर मुंडे, माजी आमदार राजेंद्र जगताप इत्यादी नेते उमेदवारीसाठी इच्छुक होते. या इच्छुकांनी आपापल्या परीने जिल्ह्यात गाठीभेटींचे सत्र सुरूच ठेवलेले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

Dr. Jyoti Mete, Bajrang Sonwane, Pankaja Munde
Chhatrapati Sambhajinagar News : ठाकरे गटातील नाराजी नाट्य थांबेना, दानवे-खैरेंचे सूर जुळले असतानाच आता...

बजरंग सोनवणे यांनी मागच्या वेळी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात तगडी लढत दिली होती. त्यांचा निवडणूक लढविण्याचा अनुभव, दोन साखर कारखाने, तसेच जिल्ह्यातील प्रचार यंत्रणा या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले. मात्र, दरम्यानच्या काळात शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे यांचेही नाव उमेदवारीच्या चर्चेत आले. दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांचे विविध समाज घटकांसाठीचे योगदान, डॉ. मेटे यांचा प्रशासकीय अधिकारी म्हणून अनुभव आणि त्यांच्याबद्दलची सहानुभूती आदी मुद्द्यांमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील एका गटाने त्यांच्या नावासाठी जोर धरला आहे.

Dr. Jyoti Mete, Bajrang Sonwane, Pankaja Munde
Lok Sabha Election News : लोकसभा नको रे बाबा! काळे-चव्हाणांनी हात जोडले…

मागच्या पंधरा दिवसांपासून बजरंग सोनवणे की डॉ. ज्योती मेटे यापैकी नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, बजरंग सोनवणे व डॉ. ज्योती मेटे यांनीही जिल्ह्यात गाठीभेटींचे सत्र सुरू ठेवले आहे. मात्र, दौघांपैकी नेमका उमेदवार कोण, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अशातच आज डॉ. मेटे व पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात भेट होणार आहे. त्यामुळे आता सोनवणे की मेटे याचा फैसला या दोन दिवसांत होऊ शकतो, अशी माहिती आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com