Bjp News : फडणवीसांच्या कार्यक्रमांना न जाणाऱ्या पंकजा मुंडेंना आता बॅनरवरही जागा नाही..

Pankaja Munde : बॅनर आणि त्यात पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे आता नव्या वादाला सुरूवात होवू शकते.
Welcome Banner In Aurangabad News
Welcome Banner In Aurangabad NewsSarkarnama

Aurangabad : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडतच आहेत. गहिणीनाथ गडावरील फडणीवसांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा (Pankaja Munde) आणि प्रितम मुंडे या दोघींनीही दांडी मारली होती.

Welcome Banner In Aurangabad News
Jayant Patil News : आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे आज बहुजनांची मुलं विदेशात शिकतायेत..

यावर प्रसार माध्यमांकडून वारंवार प्रश्न विचारला तेव्हा पकंजा यांनी `फडणवीसांच्या कार्यक्रमांना मी गेलंच पाहिजे असे नाही, माझे प्रदेशाध्यक्ष आले त्यांच्या कार्यक्रमाला मी आले`, असे सांगत फडणवीसांबद्दल मनात असलेला राग व्यक्त केला होता. (Bjp) आता फडवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांना गैरहजर राहणाऱ्या पंकजा मुंडे यांना (Devendra Fadanvis) फडणवीसांच्या कार्यक्रमासाठीच्या बॅनरवर देखील स्थान दिले जात नसल्याचे समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जिल्हा वार्षिक नियोजनाच्या मराठवाडास्तरीय बैठक व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यासाठी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सहकार मंत्री अतुल सावे यांच्यावतीने एक बॅनर लावण्यात आले होते.

या बॅनरवर भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांचे फोटो होते, परंतु पंकजा मुंडे यांचा फोटो नव्हता. विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात लावलेल्या या बॅरची चर्चा दिवसभर सुरू होती.यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नसली तरी फडणवीस समर्थकांकडून देखील आता पंकजा मुंडे यांना जशास तसे उत्तर दिले जात असल्याचे बोलले जाते. औरंगाबादेत लावण्यात आलेले बॅनर आणि त्यात पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे आता नव्या वादाला सुरूवात होवू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com