Parbhani Political News : पंकजा मुंडेंना रासपत आणणार अन् मुख्यमंत्री करणार ; जानकरांनी भाजप नेत्यांना ठणकावून सांगितले..

RSP News : आमदार गुट्टे हे चांगले काम करत आहेत. ते निवडून आलेले आमचे पहिले आमदार आहेत.
Pankaja Munde, Mahadev Jankar
Pankaja Munde, Mahadev JankarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahadev Jankar News : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला. (Parbhani Political News) तसेच आपण बहिण पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय समाज पक्षात घेऊन मुख्यमंत्री करणार असल्याचे भाजप नेत्यांना ठणकावूनही सांगितले.

Pankaja Munde, Mahadev Jankar
Beed Ncp Political News : बीडमधील पवारांच्या सभेतून क्षीरसागर देणार अजितदादांना आव्हान..

परभणी (Parbhani) जिल्हा दौऱ्यावर असलेल्या जानकर यांनी भाजपवर टीका करतांनाच गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे मेले तरी आपल्याला सोडून जाणार नाही, असा दावा करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपुर्वी गुट्टे हे आमचे गंगाखेडमधील उमेदवार असणार असे सांगितले होते. बावनकुळे यांच्या दाव्यातील हवा देखील गंगाखेडमध्येच जानकरांनी (Mahadev jankar) काढली.

राज्यभरात सुरू असलेल्या जनस्वराज यात्रेमुळे जानकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ते आले होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जानकर यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयात झालेल्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली. आमदार रत्नाकर गुट्टे मेले तरी मला सोडून जाणार नाहीत, असा दावा करतांनाच माझे २०-२५ आमदार निवडून आले तर माझी बहीण पंकजा मुंडे (Pankaja Munde) व देवेंद्र फडवणीस हे मला फोन करतील की आता काय करायचे? असेही जानकर म्हणाले.

आमदार गुट्टे हे चांगले काम करत आहेत. ते निवडून आलेले आमचे पहिले आमदार आहेत. ते पुन्हा निवडून आले तर आता आम्ही उपमुख्यमंत्री पद मागू , गुट्टे यांनी माझी इज्जत राखली, असेही जानकर म्हणाले. माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी दबावात येणार नाही. बहीण पंकजा मुंडेला भाजपकडून त्रास होतोय, असा आरोप देखील जानकर यांनी यावेळी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com