Marathwada Political News : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रभर भाजपची पाळेमुळे रोवत बनिया -ब्राम्हणांचा पक्ष बहुजनांपर्यत नेला. (Eknath Khadse on Pankaja Munde News) मी त्यांचा सहकारी होतो. मात्र, याच भाजप पक्षात त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना डावलले जात आहे. त्यांना मागे टाकणे, त्यांचा मानसिक छळ करणे व त्यांना पक्षातून बाहेर पडण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते व माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या नवव्या स्मृती दिना निमित्त खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शनिवारी गोपीनाथ गडाला भेट देऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. खडसे यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंच्यासह गोपीनाथ गडाला भेट दिली. तसेच यशश्री निवासस्थानी भेट देऊन त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, (Pankaja Munde) खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यांशी संवाद साधला.
गोपीनाथ गडावर अभिवादनानंतर खडसे (Eknath Khadse) यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवण्यासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपली हयात घालवली. सर्वोच्च ठिकाणी असताना ते अचानक आमच्यातून निघून गेल्याने आमचे व महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. भाजपने त्यांनी दिलेले योगदान विसरता कामा नये.
पण पक्षातील काही नेते पंकजा मुंडे यांना डावलत आहेत, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला. भाजप हा पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही. ज्यांचे पक्षासाठी काहीच योगदान नाही अशा नव्यांना पक्षात महत्व दिले जात आहे. दरम्यान, खडसे व पंकजा मुंडे तसेच डॉ. प्रितम मुंडे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. ही आमची कौटुंबिक भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे खडसे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.