Anti Corruption Raid : बायकोचा थकीत पगार मंजूर करून देण्यासाठी घेतली लाच; डेप्युटी सीईओसह एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

arbhani Zilla Parishad clerk News : कोतवाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
prabhani Anti Corruption bureau office, Sandip ghonsikar
prabhani Anti Corruption bureau office, Sandip ghonsikar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Parbhani News : पत्नीचे थकीत वेतन मंजूर करून देण्यासाठी एक लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याचाही सहभाग समोर आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेख असलम शेख रज्जाक (वय 43, कला शिक्षक तथा प्रतिनियुक्तीवरील लिपिक, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, परभणी) आणि डॉ. संदीप गोपाळराव घोन्सीकर (वय 42, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हा परिषद, परभणी तथा सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या पत्नीने 30 ऑक्टोबर 2024 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीतील 12 लाख 46 हजार 498 रुपये थकीत वेतन मंजूर झाले होते. हे वेतन अदा करण्यासाठी शेख असलम यांनी 15 टक्के रक्कम, म्हणजेच एक लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. 20 नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.

त्यानंतर गुरुवारी बसस्थानकाजवळील मीलन ऑप्टिकलसमोर सापळा रचण्यात आला. दुपारी 3.12 वाजण्याच्या सुमारास शेख असलम यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. पुढील चौकशीत ही रक्कम वरिष्ठ अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासाठी स्वीकारल्याचे शेख असलम यांनी पंचांसमक्ष सांगितले. त्यानंतर त्यांनी घोन्सीकर यांना फोन करून रक्कम स्वीकारल्याची माहिती दिली.

prabhani Anti Corruption bureau office, Sandip ghonsikar
BJP Leader Fraud : भाजपच्या तालुकाध्यक्षाला पोलिसांनी उचललं; बीएमसीत नोकरीचे आमिष दाखवून सहा जणांकडून उकळले लाखो रुपये

पैसे घरी घेऊन येण्यास सांगितल्याचेही पडताळणीत निष्पन्न झाले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक किशोर तरोणे यांच्या पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एसीबीच्या या कारवाईत परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप घोन्शीकर जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

prabhani Anti Corruption bureau office, Sandip ghonsikar
NCP Politics : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राजीनामा, पक्षाने जाहीर केली भूमिका; स्पष्टच सांगितले, 'त्या' ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स...

घोन्शीकर याच्याकडे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त सहायक आयुक्त या पदाचा पदभार आहे. तर त्यांच्या नियंत्रणाखाली या विभागात जिंतूर येथील किशनराव वसेकर निवासी अस्थिवंग विद्यालयातील कलाशिक्षक शेख अस्लम शेख रज्जाक हा प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. या दोघांविरुद्ध एका 65 वर्षीय व्यक्तीने 17 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. थकीत वेतन अदा करण्यासाठी सहायक आयुक्त कार्यालयातील लिपीक शेख असलम याने 11 ऑक्टोबर 2026 रोजी तक्रारदार यांना थकीत वेतनाच्या 15 टक्के रक्कम त्यांना दिल्याशिवाय थकीत वेतन अदा करणार नाही, असे म्हणून धमकावून लाचेची मागणी केली.

prabhani Anti Corruption bureau office, Sandip ghonsikar
Congress Internal Dispute : कमाल टायमिंग! डिलीमिटेशन विधेयकापूर्वीच काँग्रेसच्या खासदाराची जाहीर नाराजी, अधिवेशनाला अनुपस्थित राहणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.