Parbhani Congress : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांचे मनोबल खचले...

Ashok Chavan News : आमदार सुरेश वरपूडकर यांचे हायकमांड म्हणून अशोक चव्हाण ओळखले जातात. चव्हाण यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला, त्यानंतरही वरपूडकर यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही.
Congress-Ashok Chavan
Congress-Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे मराठवाड्यात व विशेषतः नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षातील अशोक चव्हाण यांचे समर्थक त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

पक्षाचे मुख्य प्रतोद तथा पाथरी विधानसभा मतदारसंघातील आमदार सुरेश वरपूडकर (Suresh warpudkar) हे सध्या तरी कॉंग्रेस पक्षातच आहेत. मात्र संभाव्य पडझडीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षात कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समितीवर कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. तसेच, परभणी महापालिकाही पक्षाच्या ताब्यात होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress-Ashok Chavan
Thackeray Group News : घटनेच्या आठ वर्षांनंतर गुन्हा दाखल; उद्धव ठाकरेंचा बडगुजर यांना फोन

परभणी जिल्ह्यातील पक्ष विस्तारात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे मोठे योगदान राहिले आहे. जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे अनेक समर्थक आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे यांनी चव्हाण यांच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. तसेच, येत्या काळात अनेक नेते चव्हाण यांच्यासोबत असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठवाड्यातील दिग्गज नेते असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पक्षात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. दिवसेंदिवस पक्षाची वाताहत होत असल्यामुळे संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. मात्र, पक्षाकडून अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना कॉंग्रेस पक्षात मात्र थंड वातावरण आहे.

कॉंग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार असलेल्या मुस्लीम समाजाचे परभणी जिल्ह्यातील नेते महायुतीच्या बाजूने आहेत. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी परभणी शहरातील कॉंग्रेसचे नेते माजू लाला यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या पारंपारिक मतपेटीला सुरुंग लागला आहे.

Congress-Ashok Chavan
Loksabha Election 2024 : सातारा मतदारसंघ अजित पवारांकडे? बारामती, साताऱ्याला भाजपचा निरीक्षकच नाही

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असली तरी एमआयएम स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्याचाही फटका कॉंग्रेसला बसू शकतो. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणारे समर्थक नेते, अल्पसंख्याक समजातील नवे नेतृत्व व एकूणच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाहीत.

Congress-Ashok Chavan
MLAs Disqualification Case : काँग्रेसच्या सहा बंडखोरांची आमदारकी रद्द; राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग भोवले

नेत्यांचेच मनोबल खचल्याने कार्यकर्त्यांमध्येही औदासिन्य दिसून येत आहे. त्यामुळे सर्व पक्षात लोकसभा निवडणुकीची लगीनघाई चालू असताना कॉंग्रेस मात्र थंडावली आहे. आमदार सुरेश वरपूडकर यांचे हायकमांड म्हणून अशोक चव्हाण ओळखले जातात. चव्हाण यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला, त्यानंतरही वरपूडकर यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही.

परभणी जिल्ह्यातील काँग्रेस आणखी कुमकुवत होऊ नये, यासाठी त्यांच्याकडून काही प्रयत्नही होताना दिसत नाहीत. एकंदरीत जिल्ह्यातील काँग्रेस सध्या रामभरोसे असल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिली तर नांदेड, धाराशिवनंतर परभणीही काँग्रेसमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा मराठवाड्यातील तिसरा जिल्हा ठरेल.

Edited By : Vijay Dudhale

Congress-Ashok Chavan
PMC Sealed Deccan Mall : मॉलचा मिळकत कर राणे कुटुंबीयांच्या नावानं, पण पालिकेचं अजबच स्पष्टीकरण; चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com