PMC Sealed Deccan Mall : मॉलचा मिळकत कर राणे कुटुंबीयांच्या नावानं, पण पालिकेचं अजबच स्पष्टीकरण; चर्चांना उधाण

Rane Property In Deccan Mall Sealed By PMC : पुणे महापालिकेनं मंगळवारी राणे कुटुंबियांशी संबंधित मॉल सील केलं होतं.
narayan rane pmc
narayan rane pmcsarkarnama
Published on
Updated on

पुणे : 29 फेब्रुवारी 2024 | मिळकत कराची थकबाकी न भरलेल्या मालमत्ता सील करण्याची कारवाई पुणे पालिका प्रशासनानं सुरू केली आहे. मिळकत कर थकवल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर असलेल्या मॉलवर पालिकेनं कारवाई करत मंगळवारी ( 27 फेब्रुवारी ) सील केलं होतं. पण, त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाल्यानंतर ही मिळकत केंद्रीय मंत्र्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित नसल्याचं स्पष्टीकरण पालिकेनं दिल आहे.

narayan rane pmc
Lok Sabha Election 2024 : कोणावर होणार उमेदवारीची 'कृपा'? सिंह पुण्यात; इच्छुकांमध्ये धाकधूक

विशेष म्हणजे मिळकत कराच्या बिलावर केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. तरीही पालिकेनं हे स्पष्टीकरण दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महापालिकेनं ( Pune Corporation ) मालमत्ता कर थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्यांना नोटीसा देऊन ठराविक मुदतीत मिळकत कर न भरल्यास त्यांची मालमत्ता सील करण्याची कारवाई पालिकेनं सुरू केली आहे. उपायुक्त माधव जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवारी कोट्यवधींची थकबाकी न भरल्यानं डेक्कन परिसरात असलेला एक मॉल मिळकत कर विभागानं सील केला ( Pmc Sealed Deccan Mall Not Paying Property Tax ) होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्याशी संबंधित हा मॉल आहे. या मॉलकडे तीन कोटी 77 लाख रूपयांची थकबाकी आहे. पण, बुधवारी मॉलच्या संबंधितांकडून महापालिकेला 25 लाखांचा चेक देण्यात आला. मिळकत कर आकारणीवर आक्षेप नोंदविल्यानं सुनावणी घेऊन पुढील कारवाई करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.

narayan rane pmc
Lok Sabha Election 2024 : मावळ मतदारसंघावर राष्ट्रवादी अन् भाजपचा दावा, श्रीरंग बारणे म्हणाले...

महापालिकेच्या मिळकत कराच्या बिलावर मॉलच्या संबंधित व्यक्तींची नावे आहेत. मात्र, असे असतानाही हा मॉल केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा त्यांच्या कुटुंबाशी संबंधित नसल्याचं स्पष्टीकरण महापालिका प्रशासनानं दिलं आहे. पालिकेच्या मिळकत कर विभागानं हे स्पष्टीकरण दिल्यानं उलट सुलट चर्चा पालिकेत सुरू झाल्या आहेत.

narayan rane pmc
Yashwant Sugar Factory Election : 'यशवंत'च्या निवडणुकीत 'किटली' विरुद्ध 'कपबशी' लढत रंगणार!

"डेक्कन येथील मॉलनं पालिकेकडे 25 लाख रूपयांचा चेक दिला आहे. थकबाकीबाबत संबंधितांचे काही आक्षेप आहेत. त्याप्रकरणी सुनावणी घेऊन योग्य ती कर आकारणी महापालिकेच्या वतीनं केली जाईल," अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.


( Edited By : Akshay Sabale )

narayan rane pmc
Shirur Lok Sabaha Election 2024 : शिरुर लोकसभेसाठी 'या' दोन दादांमध्ये काँटे की टक्कर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com