Thackeray Group News : घटनेच्या आठ वर्षांनंतर गुन्हा दाखल; उद्धव ठाकरेंचा बडगुजर यांना फोन

Police FIR on Sudhakar Badgujar : दबावापोटी हा गुन्हा दाखल झाला असून यासंदर्भात पोलिसांवर प्रचंड दबाव होता. राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल झाला आहे, तरीही आपण त्याला सामोरे जाऊ. यालयावर आपला पूर्ण विश्वास आहे.
Uddhav Thackeray |Sudhakar Badgujar
Uddhav Thackeray |Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : घटना घडल्यानंतर आठ वर्षांनी आणि तपासानंतर आठ महिन्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयात लढा देऊ, असे बडगुजर यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे बडगुजर यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी विधिमंडळात आरोप केला होता. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासमवेतचे बडगुजर असलेले छायाचित्र राणे यांनी दाखविले होते.

2016 मधील या प्रकरणावर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून दबाव असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला आहे. आठ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाराबाबत झालेला हा गुन्हा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray |Sudhakar Badgujar
Maharashtra Interim budget 2024 : बाळासाहेब थोरातांनी पहिल्या तासातच सरकारला धारेवर धरले, ‘आम्ही रात्रभर जागचं राहावं का?’

पोलिसांनी बुधवारी सायंकाळी हा गुन्हा दाखल केला, त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः बडगुजर यांना फोन करून त्यांची चौकशी केली. या अडचणीच्या काळात शिवसेना पक्ष आणि सर्व कार्यकर्ते बडगुजर यांच्या पाठीशी असतील, असे ठाकरे यांनी सांगितले शिवसेनेच्या विविध नेत्यांनी देखील बडगुजर यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.

याबाबत सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) म्हणाले, ‘पोलिसांनी गुन्हा दाखल केला, हे मी ऐकले आहे. त्याबद्दल ठोस माहिती नाही. मी जर बेकायदेशीर कृत्य केले असेल तर, त्याचा गुन्हा आठ वर्षांनी दाखल झाला आहे. हे लक्षात घेतले पहिजे.

दबावापोटी हा गुन्हा दाखल झाला असून यासंदर्भात पोलिसांवर प्रचंड दबाव होता. राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल झाला आहे, तरीही आपण त्याला सामोरे जाऊ. न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे. या खटल्याबाबत न्यायालयीन लढाईत आपल्याला नक्कीच न्याय मिळेल.

या प्रकरणाचा विचार केला तर, फक्त माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अन्य पक्षाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. का? आम्ही केले ते पाप आणि इतरांनी केले ते पुण्य आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.

Uddhav Thackeray |Sudhakar Badgujar
Karjat Jamkhed MIDC : कर्जतमध्ये MIDC होणार; 400 हेक्टर जमिनीला प्राथमिक संमती, ग्रामस्थांनी मानले राम शिंदेंचे आभार

शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या संदर्भात एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. त्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली असती तर बरेच काही बाहेर आले असते. त्या प्रकरणानंतर खासदार गोडसे यांचा सीडीआर तपासला असता, तर त्यात अनेक बाबी पुढे आले असत्या. मात्र, पोलिस सध्या सोयीनुसार भूमिका घेत आहेत, अशी नाराजीही बडगुजर यांनी व्यक्त केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात तो चर्चेचा विषय आहे. येथे निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे बडगुजर म्हणाले. पक्ष माझ्या पाठीशी असल्याने आणि मी निर्दोष असल्याने मी निश्चित आहे असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Uddhav Thackeray |Sudhakar Badgujar
Sushma Andhare Vs Kapil Patil News : 'गर्दी जमत नाही म्हणून त्यांनी..' ; सुषमा अंधारेंनी कपिल पाटलांना लगावला टोला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com