Arjun Khotkar: अर्जुन खोतकर मुलाच्या पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवारांना भेटले, जालन्यातून भास्कर आंबेकरांसाठीही घातली गळ!

Parbhani Hingoli MLC Election News: परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी मुलाच्या पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली
Arjun Khotkar
Arjun Khotkar Sarkarnama
Published on
Updated on

MLC Election News : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे, त्या विप्लव बजोरिया यांना महायुतीकडूनच मोठा विरोध होत आहे. या विरोधातूनच या मतदरासंघातून शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांचे नाव पुढे आले. याच संदर्भात अर्जुन खोतकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे.

परभणी-हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आपला मुलगा अभिमन्यू पवार यांना द्यावा, अशी मागणी या भेटीत खोतकरांनी केल्याची खात्रीलायक माहिती आहे. या शिवाय छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भास्कर आंबेकर यांच्या उमेदवारीला राष्ट्रवीदाचा पाठिंबा असावा, अशी विनंती खोतकरांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या सतरा जागांसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपाने शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली या जागांवर दावा सांगीतल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत, मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे या दोन्ही जागा शिवसेनेकडे असून अनुक्रमे अंबादास दानवे, विप्लव बजोरिया यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Arjun Khotkar
Farmer Loan Waiver Maharashtra: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आचारसंहितेतही कर्जमाफीला निवडणूक आयोगाची मंजुरी

परभणी-हिंगोली मतदारसंघातून विप्लव बजोरिया यांना महायुतीतील सर्वच घटक पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी आपले सुपुत्र अभिमन्यू यांच्यासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. बजोरिया यांना रोखण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी व स्थानिक शिवसेनेचे नेते इतर कुठल्याही उमेदवाराला मदत करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात अर्जुन खोतकर यांचे दोन्ही जिल्ह्यातील पाच-सहा आमदारांशी बोलणे झाल्याची माहिती आहे.

Arjun Khotkar
Pune Congress News: ‘कोल्हापूरात हरला, पुण्यात पक्ष सपाट केला’; बंटी पाटलांविरोधात पुण्यात पोस्टरवॉर

स्थानिक पातळीवर फिल्डिंग लावल्यानंतर खोतकर यांनी आता राज्य पातळीवर अभिमन्यू खोतकर यांच्या उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांची आज खोतकर यांनी भेट घेत त्यांना अभिमन्यू खोतकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली.

जालन्यातून आंबेकरांसाठी लाॅबिंग..

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी इथे भाजपाने सध्याच्या संख्याबळावरून दावा केला आहे. अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व या पुर्वी या मतदारसंघातून केले आहे. अर्जुन खोतकर यांनी या जागेवरही आपले समर्थक व नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदेसेनेत आलेले भास्कर आंबेकर यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीत देखील खोतकर यांनी आंबेकरांच्या नावाला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com