Parbhani Hingoli MLC Election: काँग्रेसच्या आखडत्या हाताने फडकला होता परभणी-हिंगोलीवर शिवसेनेचा भगवा; यंदाही विजयाची पुनरावृत्ती?

MLC Election : परभणी हिंगोली स्थानिक मतदारसंघाच्या 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ असतानाही उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव झाला होता. त्याला कारणीभूत काँग्रेसचा आखडता हात ठरला होता, असे सांगितले जाते.
Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavis
Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : सर्वसाधारणपणे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ सोबत असताना विजय निश्चित मनाला जातो. परभणी हिंगोली स्थानिक मतदारसंघाच्या 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ असतानाही उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव झाला होता. त्याला कारणीभूत काँग्रेसचा आखडता हात ठरला होता, असे सांगितले जाते.

काँग्रेसच्या या भूमिकेमुळेच शिवसेनेला परभणी मतदारसंघावर भगवा फडकवता आला होता. यंदाही महायुतीच्या सईद खान यांच्याकडून गेल्यावेळच्या विजयाची पुनरावृत्ती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

परभणी हिंगोली स्थानिक मतदारसंघासाठी 2018 मध्ये निवडणूक जाहीर झाली. या मतदारसंघातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी हे प्रमुख दावेदार होते तर युतीकडून शिवसेनेला जागा मिळाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाटाघाटीत परभणी हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला मिळाला. काँग्रेसने या ठिकाणी सुरेश देशमुख यांना उमेदवारी दिली.

तर शिवसेनेकडून अकोला येथील आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी दिली. काँग्रेस- राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता व बाहेरील उमेदवार लादल्याची लोकभावना बघता सुरेश देशमुख यांचा सहज विजय होईल, अशी खात्री सर्वाना होती. मात्र, घडले उलटेच. सुरेश देशमुख यांचा पराभव झाला आणि शिवसेना उमेदवार विल्पव बाजोरिया विजयी झाले.

Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavis
Solapur MLC Controversy: ऐनवेळी मुलाचा अर्ज मागे, उत्तम जानकरांचं बंड, दगा दिल्याचा आरोप; धैर्यशील मोहिते पाटलांचा एक घाव दोन तुकडे

पक्षीय बलाबल

2018 च्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सर्वात मोठा पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस. पक्षाकडे सर्वात जास्त 162 एवढे संख्याबळ होते. तर त्या खालोखाल काँग्रेस पक्षाकडे 135 सदस्य होते. 97 सदस्य असणारी शिवसेना तिसऱ्या स्थानी होती. तर भाजपकडे 51 सदस्यसंख्या होती.

रासप 7, मनसे 5 एमआयएम 1 आणि अपक्ष 43 असे एकूण 501 मतदार होते. आकडेवारीवरून लक्षात येते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 162 व काँग्रेसचे 135 असे मिळून 297 संख्याबळ होते. अपक्ष गृहीत न धरताही काँग्रेस व राष्ट्रवादीचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकत होता.

Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavis
Solapur Politics: सोलापूर विधानपरिषद बिनविरोध करण्यासाठीचा भाजपचा अखेरचा डावही फसला; उज्ज्वल निकमांमार्फत थेट उमेदवारावरच टाकलं जाळं..?

...आणि निकाल फिरला

संख्याबळ आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशा स्थितीत सुरेश देशमुख हेच विजयी होतील, असा कयास असताना काँग्रेस पक्षाने आपला हात आखडता घेतला. दुसरीकडे शिवसेना उमेदवार विप्लव बजोरिया यांनी जबरदस्त अर्थपूर्ण नियोजन केले. बजोरिया यांच्या नियोजनासमोर काँग्रेस पक्षाचे अवसान गळाले आणि अनपेक्षितरित्या अकोला निवासी विप्लव बाजोरिया यांचा विजय झाला.

काँग्रेस राष्ट्रवादीकडे 297 संख्याबळ असताना सुरेश देशमुख यांना 221 मते मिळाली तर शिवसेनेकडे अवघे 97 सदस्य असताना विल्पव बजोरिया यांनी 256 मते घेत विजयश्री खेचून आणली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com