Chhatrapati Sambhajinagar : मराठवाडा हा शिवसेनेचा ( Shivsena ) बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी म्हणजे युती असताना लोकसभेचे ( Lok Sabha Election 2024 ) आठपैकी चार मतदारसंघ वाट्याला यायचे. याचा अर्थ अर्धा मराठवाडा. पण, शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेची चांगलीच दमछाक होताना दिसत असून, अद्याप अधिकृतपणे फक्त हिंगोली मतदारसंघ मिळाला आहे. आता छत्रपती संभाजीनगर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकते.
मराठवाड्यातून शिंदे सेनेला ( shivsena Shinde Camp ) चार जागा मिळणे अपेक्षित आहे. पण, जास्तीत जास्त दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपात सेनेचं 50 टक्के नुकसान होऊ शकते, तर महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi ) ठाकरे गटाने मात्र आपल्या चारही जागांवर उमेदवारी मिळविण्यात सहजपणे यश मिळविले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या वाट्याला छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव हे मतदारसंघ येत होते. त्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता तीन मतदारसंघांवर शिवसेनेनं विजय मिळवला होता. पण, शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटाची मराठवाड्यात चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसत आहे.
सध्या हिंगोली हा एकमेव मतदारसंघ भाजपने शिंदे गटाला दिला आहे. त्यातही या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील ( Hemant Patil ) यांना जाहीर झालेली उमेदवारी त्यांना मागे घेत बाबूराव कदम कोहळीकर ( Baburao Kadam Kohlikar ) यांना संधी देण्यात आली आहे. परभणी हा बालेकिल्ला असताना त्यांना महायुतीमध्ये ही जागा महादेव जानकर यांना द्यावी लागली, तर धाराशिवमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं हक्क सांगत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील ( Archana Patil ) यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धाराशिव आणि परभणीचा बालेकिल्ला शिंदे गटाला सोडून द्यावा लागला आहे.
महायुतीमध्ये नुकसान कोणाचे?
रासपचे नेते महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांना अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या कोट्यातून परभणीची जागा द्यायला लावून भाजपनं शिंदे गटाची एक जागा कमी केली, तर धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करायला लावत त्यांना मैदानात उतरवले. धाराशिववर शिंदे गटाचा हक्क असताना त्यांना ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडावी लागली. त्यामुळे महायुतीत सर्वाधिक नुकसान शिंदे गटाचं झालेलं आतापर्यंतच्या जागावाटपावरून स्पष्ट होत आहे.
छत्रपती संभाजीनगरची चर्चा सुरू
भाजपने स्वतःचे चार आणि जानकरांच्या रूपाने परभणी, असे पाच लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवले आहेत. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगरवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. संभाजीनगरच्या जागेसाठी शिंदे गट अडून बसल्यानं भाजपनं एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जात आहे. संभाजीनगरची जागा शिंदे गट आपल्याकडे राखू शकला, तर मराठवाड्यात त्यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.