Raju Patil News : "गद्दारांना मदत नाही," राजू पाटलांचा राग कोणावर?

Raju Patil On Mahayuti : महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या वादावर राजू पाटलांनी मोठं विधान केलं आहे.
Raju Patil
Raju Patilsarkarnama
Published on
Updated on

ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली, त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. आमच्या भावना आम्ही राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यापर्यंत पोहोचवू, असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांनी कल्याण-डोंबिवल्याच्या उमेदवार वैशाली दरेकर ( Vaishali Darekar ) यांच्यावर आपला राग व्यक्त करत इशारा दिला. आमच्या भावनांपेक्षा राज ठाकरेंचा आदेश महत्त्वाचा असेल, असंदेखील राजू पाटलांनी म्हटलं. ते डोंबिवलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून कोणाला पाठिंबा असणार? या प्रश्नावर राजू पाटील ( Raju Patil ) म्हणाले, "या ठिकाणी आमचा उमेदवार ठरलेला नाही. तसेच, राज ठाकरेंचा आदेश आला नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, हे ठरलं नाही. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पुढील दिशा समजेल."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे ( Raj Thackeray ) गुढीपाडव्याला काय बोलणार? असं विचारलं असता राजू पाटलांनी म्हटलं, "राज ठाकरे काय बोलतील ते शर्मिला वहिनीसुद्धा सांगू शकत नाहीत, त्यामुळे आम्ही काय सांगू. मात्र, नक्की ते महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचं बोलतील. त्याची गॅरंटी आम्हाला आहे."

Raju Patil
Raj Thackeray News : भाजपचे पापक्षालन, ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना परत ?

महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या वादावर राजू पाटलांनी मोठं विधान केलं आहे. "पहिली ही लोकं एकत्र निवडणुकीला सामोरे गेले होते. पण, त्यात अजून एक गट सामील झाला आहे. लोकसभा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर तर विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत दिसेल. तेव्हा यांची युतीही नसेल," असं भाकीत राजू पाटलांनी व्यक्त केलं आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Raju Patil
Raj Thackeray MNS : एकनाथ शिंदेंचा पत्ता कट, राज ठाकरे होणार शिवसेनेचे प्रमुख; काय आहे भाजपचा प्रस्ताव?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com