Parbhani Loksabha Constituency News : परभणीत ठाकरेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीत टक्कर ?

Shivsena-NCP News : महाविकास आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) पक्षाकडे असणार हे उघड आहे.
Parbhani Loksabha Constituency News
Parbhani Loksabha Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने देशातील सर्वच राजकीय पक्ष अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विशेषतः राज्यात २०१९ च्या तुलनेत राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाल्याने सर्वच पक्षांना जागावाटपाचे अवघड गणित सोडवण्याचे आव्हान असणार आहे. (Parbhani Loksabha Constituency News) भाजप, शिवसेना(शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा गट) यांची महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.

Parbhani Loksabha Constituency News
Eknath Shinde, Devednra Fadnavis : शिंदे-फडणवीसांना धनगर आरक्षणाचा धसका? बारामतीत येणेच टाळले...

राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) (NCP) पक्षाने जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघाची आग्रही मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाली तर राजेश विटेकर हेच परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील. २०१९ मध्ये (Shivsena) शिवसेनेचे संजय जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राजेश विटेकर यांच्यात लढत झाली होती. यात संजय जाधव विजयी झाले तर राजेश विटेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठवाड्यात मोठी पडझड झाली. मात्र, परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने परभणी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) व परभणी लोकसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) पक्षाकडे असणार हे उघड आहे. मात्र, या वेळी त्यांच्याकडे पक्षचिन्ह नसणार आहे, तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे पाठबळ असणार आहे. कॉंग्रेस पक्षाच्या पारंपरिक मतपेटीचा संजय जाधव यांना नक्कीच फायदा मिळणार आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेल्या सहानुभूती मतपेटीतून व्यक्त होऊ शकते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर परभणी जिल्ह्यात राजेश विटेकर यांनी सर्वात प्रथम पाठिंबा व्यक्त केला. राजेश विटेकर हे पूर्वीपासूनच अजित पवार यांचे समर्थक आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली असल्याने विटेकर हे प्रमुख दावेदार आहेत. तसेच राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री संजय बनसोडे यांची परभणीच्या पालकमंत्रिपदी निवड केल्यामुळे अजित पवार गटाचे परभणी लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याचे दिसून आले होते.

Parbhani Loksabha Constituency News
OBC Vs Maratha : 'ओबीसींचा एल्गार अभी बाकी है !' प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा

विटेकर यांना उमेदवारी मिळाली तर भाजप, शिवसेना शिंदे गटाचे पाठबळ मिळणार असले तरी नुकतेच अजित पवार गटात प्रवेश केलेले आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण पक्षात फूट पडण्यापूर्वीपासूनच विटेकर व दुर्राणी यांच्यात फारसे कधी जमले नाही.

पक्षाच्या कार्यक्रमातसुद्धा दोघांनी एकत्र येणे टाळले होते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संजय जाधव व राजेश विटेकर यांच्यात मुख्य लढत असली तरी वंचित बहुजन आघाडी, भारत राष्ट्र समिती यांचे उमेदवारही निवडणूक निकालावर परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com