OBC Vs Maratha : 'ओबीसींचा एल्गार अभी बाकी है !' प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा

Prakash Shendge : ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास सरकारला खाली खेचू
Prakash Shendge
Prakash ShendgeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मनोज जरांगे पाटलांनी जालन्यातील अंबडच्या आंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाचा हुंकार दिला. त्याच अंबड येथे आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसांचा महाएल्गार झाला. ही एतिहासिक सभा असली तरी ओबीसांचा एल्गार अभी बाकी है, असे म्हणत आरक्षणाला धक्का लावला तर ओबीसी समाज सरकारला खाली खेचणार, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'अंबडमधून मराठा समाजाने आरक्षणाची लढाई सुरू केला आहे. त्यामुळे ओबीसींनीही तेथूनच आरक्षण बचावचा एल्गार केला. ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी पक्षाचे जोडे बाजूला ठेऊन सर्वपक्षीय नेते एकत्र आले. त्यामुळे राज्यातील ओबीसींची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. आरक्षणाला धक्का लावाल तर सराकर पाडण्याची ताकद ओबीसीमध्ये आहे,' प्रकाश शेंडगे म्हणाले.

Prakash Shendge
Eknath Shinde, Devednra Fadnavis : शिंदे-फडणवीसांना धनगर आरक्षणाचा धसका? बारामतीत येणेच टाळले...

अंबड येथील एल्गारामुळे समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा दावाही शेंडगेंनी केला. ते म्हणाले, 'मराठा समाजाच्या दबवाला बळी पडून सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सपाटाच लावला होता. रात्री-बेरात्री जीआर निघू लागले होते. मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकार आपल्या ताटातील घास हिरावण्याची शक्यता होती. परिणामी समाजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र एल्गारमध्ये सर्व नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यापुढे राज्यात सामाजिक न्याय नाकारण्याची कुठल्याच सरकारमध्ये होणार नाही,' असा दावाही शेंडगेंनी केला. (Latest Political News)

Prakash Shendge
JDS Crisis : भाजपसोबत युतीवरून जनता दलात दुफळी; विरोध करणाऱ्या मोठ्या नेत्याचं निलंबन

'अंबडमधील सभा अभूतपूर्व, एतिहासिक होती. मात्र ही सभा फक्त झॉकी है, ओबीसी का एल्गार अभी बाकी है,' असे म्हणत, 'हिंगोलीत २६ नोव्हेंबर रोजी होणारी सभा अंबडपेक्षा मोठी असेल,' असा दावा शेंडगेंनी केला. तेथेही सर्वपक्षीय नेते एकत्र येणार आहे. कुठल्याही पक्षाने ओबीसी आरक्षण फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. हे सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, त्याची चुणूकच आता राज्याने पाहिली आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले.

दरम्यान, अंबड येथे भुजबळांनी इतरांना कोट्यवधींच्या निधीचे वाटप केले जात असताना ओबीसींना सवतीची मुले असल्यासारखी वागणूक दिली जाते, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, जातीनिहाय जणगणना, ओबीसींतील जातींसाठी असलेला निधी देण्याची मागणी करणार आहोत, अशी माहिती प्रकाश शेंडगेंनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Shendge
Balasaheb Thorat And Vikhe : बाळासाहेब थोरातांची साद अन् विखे पाटील धावून आले! नेमकं काय झालं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com