Loksabha Election : 'साडेतीन लाख मतांनी मीच विजयी होणार', महादेव जानकरांना कॉन्फिडन्स

Parbhani Loksabha : परभणी लोकसभा मतदारसंघात शिट्टीच वाजणार. साडेतीन लाख मतांनी मीच विजयी होणार आहे,' असे महादेव जानकर म्हणाले.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Political News : परभणी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जानकर हे बाहेरचे आहेत, असा हल्ला जाधव यांनी केला होता. त्याला उत्तर देताना बंडू छोटा माणूस आहे. त्याला इंग्लिश येत नसल्याचा टोला जानकरांनी लगावला होता. आता प्रचारादरम्यान आपण किती लीडने निवडून येणार हेच महादेव जानकर यांनी घोषित केले आहे.

Mahadev Jankar
Sanjay Raut News : नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले...

'परभणी लोकसभा (Parbhani loksabha) मतदारसंघात शिट्टीच वाजणार. साडेतीन लाख मतांनी मीच विजयी होणार आहे,' असे महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले. जानकर यांनी आज (गुरुवारी) घनसावंगी आणि अंबड तालुक्याचा दौरा करत पायी रॅली काढत मतदारांशी संवाद साधला. आपणच विजयी होणार, असा आत्मविश्वासदेखील जानकर यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा मतदारसंघात उत्तम जानकर हे महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत ते लवकरच जाहीर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मला राज्याचा नाही केंद्राचा जानकर व्हायचंय, असा टोला महादेव जानकर यांनी उत्तम जानकर यांना लगावला.

घनसावंगी तालुक्यातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लीड देण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. घनसावंगी तालुक्यातील भाजप नेते सतीष घाटगे यांनी महादेव जानकर यांच्यासाठी तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयासाठी राजेश टोपे यांची ताकद लावली आहे.

R

Mahadev Jankar
Solapur Lok Sabha : माजी खासदारांना सोबत घेऊन फिरायला भाजपला लाज वाटते का?; प्रणिती शिंदेंचा बोचरा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com