Parbhani: उद्धव ठाकरेंच्या एकमेव महापौरांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न : स्वीय सहायकाला धक्काबुक्की, महापालिकेतील दालनातच थरार

Government Office Attack, PA Assault, Police Investigation: सरकारी कार्यालयात स्वीय सहाय्यकाला धक्काबुक्की करून चष्मा फोडल्याचा आरोप आहे. सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, चाकू बाळगल्याच्या माहितीचाही तपास सुरू आहे.
Security personnel detain an accused after an alleged assault and threats inside a government office before handing him over to police for further investigation.
Security personnel detain an accused after an alleged assault and threats inside a government office before handing him over to police for further investigation.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani Mayor : परभणी महापालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांच्यावर चाकू हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी रफिक शेख रौफ याच्याविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चाकूसह महापौरांच्या दालनात घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. आरोपी कचरा डंपिंग बाबत दिलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी आला होता. महापौरांच्या उत्तराने समाधान न झाल्याने त्याने दालनात गोंधळ घालायला सुरूवात केली.

शिवीगाळ करत रफिकने गोंधळ घालत शिव्याही दिल्या. महापौरांच्या दिशेने अंगावर जात असताना महापौरांचे स्वीय सहाय्यक मध्ये पडले तेव्हा आरोपीने त्यांना धक्काबुक्की करत त्यांचा चष्मा फोडला. दरम्यान, आरोपी रफिक याच्याकडे चाकू असल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितल्यामुळे या दृष्टीनेही पोलीसांनी तपास सुरू केला आहे. धमकी, धक्काबुक्की करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल रफिक रौफ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Security personnel detain an accused after an alleged assault and threats inside a government office before handing him over to police for further investigation.
Maharashtra Politics Live Update : विलास घुले हत्या प्रकरण; आरोपींवरील कठोर कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

महापालिकेच्या साफसफाई विभागाच्या कर्मचाऱ्याने नियमानुसार कारवाई केली होती. ही कारवाई मी करायला लावली, असा हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा समज होता. परंतु संबंधितावर झालेली कारवाई ही नियमानुसार झाली होती. कदाचित हा राग मनात ठेवून त्याने हल्ल्याचा प्रयत्न केला असावा, अशी प्रतिक्रिया महापौर सय्यद इकबाल यांनी दिली आहे.

महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्या दालनात घुसून गोंधळ घालणे, शिवीगाळ व धमकी देणे, महापौरांच्या स्वीय सहाय्यकास धक्का बुक्की करून त्यांचा चष्मा फोडणे तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शेख रफिक शेख रौफ याच्या विरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश बाबुराव चव्हाण (वय 53) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरूवारी (ता. 9) दुपारी साडे चारच्या सुमारास महापौरांच्या दालनात शेख रफीक हा कचरा डम्पिंगबाबत केलेल्या अर्जाची विचारणा करण्यासाठी आला होता. महापौरांनी संबंधित अर्जाची दखल घेतली असून आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिल्यानंतर आरोपीने संतापून मोठ्याने आरडाओरड सुरू केली. तसेच मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत महापौरांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

Security personnel detain an accused after an alleged assault and threats inside a government office before handing him over to police for further investigation.
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

यावेळी त्याला समजाविण्यास गेलेल्या स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांना धक्का बुक्की करून त्यांचा चष्मा फोडला आणि 'येथे कोणालाही काम करू देणार नाही', अशी धमकी दिली. दरम्यान, दालनातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. तसेच आरोपीकडे चाकू असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाकडून मिळाल्याचेही फिर्यादीत नमूद असून, त्याबाबतही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कमल विश्वनाथ शिंदे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com