Parbhani Loksabha Constituency : परभणीत खासदार संजय जाधव निवांत, पण महायुती धक्का देणार?

Loksabha Election 2024 : ...त्यामुळे येथून सातत्याने शिवसेनेच्या उमेदवाराने विजय मिळवला.
Parbhani LokSabha Constituency | Sanjay Jadhav
Parbhani LokSabha Constituency | Sanjay JadhavSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : शिवसेनाप्रमुखांचे परभणीकरांशी असलेले अनोखे नाते, संजय जाधव यांची आध्यात्मिक वृत्ती यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात खासदार जाधव हे सध्या तरी निवांत आहेत. पण महायुती त्यांना धक्का देण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाल्याने परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणेसुद्धा मोठ्या प्रमाणावर बदलली. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने पक्षाची उमेदवारी म्हणजे खासदारकीची हमी असे परभणी लोकसभा मतदारसंघाचे सूत्र बनले आहे.

त्यामुळे येथून सातत्याने शिवसेनेच्या उमेदवाराने विजय मिळवला. मात्र शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदाराने पक्ष बदलण्याची एक दुर्दैवी परंपरा तयार झाली. (स्व.) अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेशराव दुधगावकर यांनी पक्ष बदलले. मात्र शिवसेना खासदार संजय जाधव यांनी ही परंपरा मोडली. विशेषत: शिवसेनेच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी बंडाळी झाल्यानंतर संजय जाधव हे शिंदे गटात जातील, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या.

Parbhani LokSabha Constituency | Sanjay Jadhav
LokSabha Election 2024 : अखिलेश यांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; पत्नीसह 16 उमेदवारांची नावं जाहीर

मात्र, जाधव यांनी सर्व शक्यतांना खोटे ठरवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ दिली. संजय जाधव यांची ही सर्वात जमेची बाजू येणाऱ्या निवडणुकीत ठरू शकते. तसेच जाधव हे आध्यात्मिक वृत्तीचे असल्याने प्रतिवर्षी पंढरपूरची पायी वारी करतात. प्रसिद्ध कथावाचक पं. प्रदीप मिश्रा व बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे भव्य आयोजन परभणीमध्ये जाधव यांनी केले. त्यामुळे हिंदूत्ववादी परभणीकर मतदान आपली साथ सोडणार नाही, याची खात्री असल्याने जाधव हे सध्या तरी निवांत आहेत.

खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना धक्का देण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता यामुळे भारतीय जनता पक्षात उत्साह संचारला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजप सर्वात अग्रेसर आहे. संघाचे माजी जिल्हा संघचालक डॉ. केदार खटिंग यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तसेच लोकसभा समन्वयक व पदाधिकारी विधानसभानिहाय आढावा बैठका घेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या वतीने जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर या प्रमुख दावेदार आहेत. महायुतीच्या समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला परभणीची जागा मिळाल्यास राजेश विटेकर यांचे नाव सर्वात पुढे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू असणाऱ्या राजेश विटेकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. तसेच परभणीचे पालकमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय बनसोडे यांनीही परभणी जिल्ह्यात विशेष लक्ष दिले आहे.

या पार्श्वभूमीवर मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) किंवा राजेश विटेकर हेच महायुतीचे उमेदवार असतील, असेच सध्यातरी चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पक्षाचे जाहीर कार्यक्रम आयोजिले. तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील अनेक नेते, नगरसेवकांना शिंदे गटात प्रवेश दिला. ही बाब महायुतीसाठी जमेची ठरू शकते. त्यामुळे संजय जाधव निवांत असले तरी त्यांना धक्का देण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Parbhani LokSabha Constituency | Sanjay Jadhav
Mahavikas Aghadi : हुश्श...! अखेर महाविकास आघाडीने 'वंचित'साठी दार उघडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com