Parbhani Mahapalika : महापालिकेत ठाकरेंच्या उमेदवाराचा केवळ एका मताने विजय; पराभूत भाजपचा उमेदवार कोर्टात!

Parbhani Municipal Election News : परभणी महापालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये एका मताने पराभूत झालेल्या भाजप उमेदवाराने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकाच्या विजयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
BJP candidate approaches court after losing Parbhani Municipal Corporation ward election by one vote to Shiv Sena UBT candidate, alleging irregularities in postal ballots and voting process.
BJP candidate approaches court after losing Parbhani Municipal Corporation ward election by one vote to Shiv Sena UBT candidate, alleging irregularities in postal ballots and voting process.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराविरोधात केवळ एका मताने पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवाराने आता कोर्टात धाव घेतली आहे. परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे व्यकंट डहाळे हे केवळ एका मताने विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रसाद नागरे यांचा पराभव केला होता. या निकालावरून तेव्हा तीन तास गोंधळ सुरू होता. सर्व बाजू तपासल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी डहाळे यांचा एका मताने विजय झाल्याचे जाहीर केले होते.

पराभूत भाजप उमेदवार प्रमोद नागरे यांचे या निकालाने समाधान झाले नाही. अखेर त्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेच्या मतमोजणीच्या दिवशी परभणीतील प्रभाग क्रमांक एक मधील या निकालाने मोठा गोंधळ उडाला होता. भाजपच्या उमेदवाराने नोंदवलेला आक्षेप निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी फेटाळून लावत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार व्यंकट डहाळे यांना विजयी घोषित केले होते. आता याच निकालाविरोधात दाद मागण्यासाठी नागरे यांनी न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणीही नागरे यांनी केली आहे. ज्या पोस्टल मताच्या मोजणीतून ठाकरेंच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले होते, त्या 7 पोस्टल मत करणाऱ्या मतदारांचे कुठलेही कागदपत्रे निवडणूक विभागाकडे नाहीत, असा दावा हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. शिवाय एका सामान्य मतदाराला पोस्टल मताचा अधिकार देण्यात आला, विजयी उमेदवाराच्या नातेवाईकांनीच या प्रभागात 2 वेळा मतदान केले.

BJP candidate approaches court after losing Parbhani Municipal Corporation ward election by one vote to Shiv Sena UBT candidate, alleging irregularities in postal ballots and voting process.
Parbhani ZP Elections: माजी मंत्र्यांच्या कुटुंबातील 5 जण झेडपीच्या रिंगणात; तिघे जण भाजपकडून, मुलगी 'मशाल' तर पुतण्या काँग्रेसचा उमेदवार

तसेच इतर नातेवाईकांनी विविध शहरात नगर परिषदेला मतदान करून परभणीत महापालिकेच्या निवडणुकीतही मतदान केल्याचा आरोप प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवाराकडून करण्यात आला आहे. या आरोपांसह अनेक प्रमाणित पुरावे घेऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

BJP candidate approaches court after losing Parbhani Municipal Corporation ward election by one vote to Shiv Sena UBT candidate, alleging irregularities in postal ballots and voting process.
Parbhani ZP News : परभणीत जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड ठरणार 'पॉवर टेस्ट' : राजकारणाला मिळणार नवी दिशा

तसेच निवडणूक आयोगाकडे देखील या प्रभागातील निवडणूक पुन्हा पारदर्शकपणे घ्यावी, अशी मागणी भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्यांनी केली आहे. या निवडणूक निकाल प्रक्रियेत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com