Parbhani NCP Politics : परभणीत शिंदे-अजितदादा गटाचे जुळेना...

Shivsena-NCP News : शासनाकडून आलेल्या निधीचा वापर केवळ कुटुंबातील व्यक्तींच्या लाभासाठी कसा होईल, हेच आजपर्यंत बघितले गेले.
Parbhani NCP Politics News
Parbhani NCP Politics NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Political News : परभणी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटात राजकीय संघर्ष पेटला आहे. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पुन्हा एकदा आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याविरुद्ध तोफ डागली आहे. (Parbhani Political News) ३५ वर्षे ज्यांनी केवळ द्वेषाचे राजकारण केले, त्यांनी विकासाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल केली. मात्र, जनतेने हे सगळे ओळखल्याने आता जशास तसे उत्तर दिले जाईल. जनतेच्या दरबारात पोलखोल केली जाईल, लोकांना गृहीत धरणे सोडा आता जनता तुम्हाला सोडणार नाही, असा खणखणीत इशारा सईद खान यांनी पाथरीतूनच दुर्राणी यांना दिला.

Parbhani NCP Politics News
Parbhani Loksabha Constituency : परभणी लोकसभेवर दावा सांगत भाजप शिंदे गटाला देणार धक्का..

विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात सईद खान यांनी पुन्हा एकदा आपला बाबाजानी दुर्राणींना (Babajani Durani) असलेला विरोध दाखवून दिला. पाथरी शहरातील ३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. (NCP) पण याच कार्यक्रमात राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या शिंदे आणि अजितदादा गटात स्थानिक पातळीवर कसे बिघडलेले आहे, हे खान यांच्या टीकेवरून दिसून आले.

मागील ३५ वर्षांत शासनाकडून आलेल्या निधीचा वापर केवळ कुटुंबातील व्यक्तींच्या लाभासाठी कसा होईल हेच आजपर्यंत बघितले गेले. (Shivsena) सर्वसामान्य जनतेचे शोषण केले, पाथरी शहरात आजही नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडावे लागते. शहरात वेळेवर पाणी मिळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाथरी शहराच्या विकासकामांसाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कामाला सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगत खान यांनी दुर्राणी यांच्यावर टीकेचे बाण सोडले.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून, यासाठी सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. विशेषतः पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटात चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला.

मात्र, या निर्णयामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी अनपेक्षितपणे अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरीही दुर्राणी यांच्या अडचणी संपत नसल्याने त्यांची `इकडे आड तिकडे विहीर`, अशी अवस्था झाली आहे. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील राजकीय संघर्षात निधी खेचून आणण्यासाठी चढाओढ लागली असून, यानिमित्ताने पाथरी शहराच्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.