Parbhani Crime : राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिवसेनेच्या नगरसेवकाच्या भावाला मारहाण : परभणीत राजकीय वर्तुळात खळबळ!

Manvat Crime Case : अंकुश लाड आणि हसन युनूस बागवान यांच्यातील पूर्वीच्या वादातूनच मारहाणीचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या वादामागील नेमके कारण काय, मारहाणीच्या वेळी प्रत्यक्षात काय घडले आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
Parbhani Crime Case
Parbhani Crime CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Parbhani News, 23 Oct : परभणी जिल्ह्यातील मानवत शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी मारहाणीची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांचे पती आणि नगर परिषदेचे उपाध्यक्ष अंकुश लाड यांच्यावर शिवसेनेच्या नगरसेवकाच्या भावाला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लाड यांनी आपल्या काही समर्थकांसह संबंधित व्यक्तीला भरदिवसा मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानवत शहरात ही घटना घडली. अंकुश लाड आणि हसन युनूस बागवान यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याची माहिती समोर येत आहे. याच वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जुन्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याने या घटनेची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

Parbhani Crime Case
Manoj Jarange Patil : जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपावरून भाजप-शिवसेनेत जुंपली; दादा भुसेंचा थेट भाजपवर हल्लाबोल, म्हणाले "आरोपामागील..."

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मानवत पोलिसांनी कारवाई केली असून, नगराध्यक्षांचे पती तथा नगर परिषदेचे उपाध्यक्ष अंकुश लाड यांच्यासह सात जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.

या संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने मारहाणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मारहाण झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाय नगराध्यक्षांचे पती आणि नगर परिषदेचे उपाध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मानवतच्या राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

Parbhani Crime Case
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर! राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा

अंकुश लाड आणि हसन युनूस बागवान यांच्यातील पूर्वीच्या वादातूनच मारहाणीचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या वादामागील नेमके कारण काय, मारहाणीच्या वेळी प्रत्यक्षात काय घडले आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com