

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
उद्धव ठाकरे यांनी जाधव समर्थक जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची हकालपट्टी करून विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली.
या कारवाईनंतर नाराज झालेल्या संजय जाधव यांनी समर्थकांची बैठक घेत राजीनाम्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे.
Parbhani Shivsena UBT News : परभणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे पक्षाला लवकरच जय महाराष्ट्र करणार, अशा चर्चा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू आहेत. स्वत: संजय जाधव यांनी एका खाजगी कार्यक्रमात 'सध्या तरी मी पक्षातच आहे, पण पुढचं काही सांगता येत नाही', असे म्हणत आपल्या पक्षांतराच्या चर्चेला हवा दिली होती.
या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात संजय जाधव समर्थक जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली. या दणक्याने खासदार संजय जाधव संतापले आणि त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेत त्यांना पदांचे राजीनामे देण्यास सांगितले.
खासदार संजय जाधव यांच्याकडून पक्षावर दबाव आणला जात असला तरी त्याला न जुमानता उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील शिवसेनेत मोठे फेरबदल करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आठवडाभरापूर्वी परभणी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत संजय जाधव यांच्या पक्ष सोडून जाण्याने किती नुकसान होऊ शकते? याचा अंदाज घेतला होता.
जाधव यांच्यासोबत कोण पदाधिकारी कार्यकर्ते जाऊ शकतात याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याआधीच त्यांना नारळ देण्याचा सपाटा पक्ष नेतृत्वाने लावला आहे. संजय जाधव हे आता पक्षाचा भाग नाहीत, अशा पद्धतीने नव्याने संघटनात्मक बांधणी परभणी मध्ये सुरू झाली आहे. जिल्हाप्रमुख बदलल्यानंतर आता जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये विधानसभा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, शहर प्रमुख, शहर संघटक आणि युवा सेना तालुका अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये कल्याणराव रेंगे यांच्यावर पाथरी विधानसभा प्रमुख पदाची, तर राम पाटील खराबे यांच्यावर जिंतूर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय कृष्णा पिंगळे सोनपेठ, मुंजाभाऊ कोल्हे पाथरी, मानवत भारत पवार जिंतूर, माधवराव शेंडगे गंगाखेड, साहेबराव कल्याणकर पूर्णा, बालाजी लोखंडे पालम यांच्यावर उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संतोष गवळी सोनपेठ, प्रभाकर कदम मानवत, हरिभाऊ वाकणकर पाथरी, अरुण ताठे सेलू, ऋतिक पांडे जिंतूर, किरण देशमुख जिंतूर, जानकीराम पवार गंगाखेड, बापूराव पोळ पालम, छगनराव मोरे पूर्णा, यांची तालुकाप्रमुख निवड करण्यात आली आहे.
आत्माराम वाघ परभणी, धोंडीराम जाधव गंगाखेड, एकनाथ मोहिते पालम हे तालुका संघटक तर अमोल दहिवाळ सोनपेठ, बालाजी दहे मानवत, माधव जाधव राणीसावरगाव, शेख मुकरम पालम, प्रताप कदम पू्र्णा, अरविंद कटारे जिंतूर हे शहरप्रमुख असतील. शक्ती बोराडे सेलू, अमोल खटिंग गंगाखेड, कांतराव धारूरकर जिंतूर यांच्यावर शहर संघटक पदाची तर गंगाखेड युवा सेना तालुका अधिकारी म्हणून भागवत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
जाधव समर्थक जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना हटवून विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली.
ते संतप्त झाल्याचे सांगितले जात असून त्यांनी समर्थकांची बैठक घेतली.
बैठकीत काही पदाधिकाऱ्यांना पदांचे राजीनामे देण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या आणि ठाकरे गटातील अंतर्गत संघर्षाच्या चर्चांना वेग आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.