Sanjay Raut : "देवेंद्र फडणवीसांशी दुश्मनी नाही..."; ऐन विधानसभेच्या तोंडावर राऊतांचं सूचक विधान, चर्चांना उधाण

Sanjay Raut On Devendra Fadnavis : ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत तर फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, याच राऊतांनी आता देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेल्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 27 Oct : देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नसल्याचं वक्तव्य शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना (Shivsena) पक्षातील फूटीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सडकून टीका केली जाते.

पक्ष फोडण्यासाठी कटकारस्थान रचणारे फडणवीसच (Devendra Fadnavis) होते. शिवाय त्यांनी राज्यातील राजकीय संस्कृती बिघडवली अशी टीका ठाकरे गटाकडून केली जाते. तर ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत तर फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

मात्र, याच राऊतांनी आता देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेल्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे राऊतांच्या मनात काही वेगळं शिजतंय का? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. एका मुलाखतीती बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांशी दुश्मनी नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Parbhani Assembly Constituency : शिवसेनेचा भाजपच्या 'आनंद'वर 'भरोसा', पक्षप्रवेश झाला, उमेदवारी मिळणार का ?

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही."

यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी', असं उघडं चॅलेंज दिलं होतं, याबाबात विचारणा केली असता राऊतांनी ते वक्तव्य देखील केवळ राजकारणापुरतं मर्यादित असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय याचवेळी फडणवीसांशी आमची कोणतीही चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Sada Sarvankar : भाजपकडून अमित ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी दबाव? सरवणकरांनी ठणकावलं; म्हणाले,'मी निवडणूक लढवणारच अन्...'

ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत

दरम्यान, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत, असं मला वाटतं, असंही संजय राऊत म्हणाले. शिवाय आमच्या मागणीचा आमच्या मित्रपक्षांनी विचार करावा. मित्र शब्दाला किंमत देतो. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, असं सांगितलं होतं. कारण राज्याचं नेतृत्व कोण करणार हे स्पष्ट झांलं की, मतदानाची टक्केवारी वाढते, असंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com