Beed Politics: मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री अन् पंकजा मुंडे एकाच हेलिकॉप्टरमधून परळीत दाखल

Dhananjay Munde and Pankaja Munde: महायुती सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम बीडमध्ये पार पडत आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Pankaja Munde
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News: बीड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीडला निश्चित असलेला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम भाजप आमदारांच्या विरोधानंतरही परळीत घेण्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यशस्वी ठरले. विशेष म्हणजे भाजपकडून कायम दूर ठेवल्या गेलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मात्र, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच एकाच हेलिकॉप्टरमधून दाखल झाल्या.

महायुती सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. बीडला कार्यक्रम व्हावा, अशी सुरुवातीला शिवसेनेची इच्छा होती. पण, कार्यक्रमासाठी निधी नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या वर्षी कार्यक्रम होऊ शकला नाही. सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सहभागी झाला आणि धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांनी कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतुदही केली आणि कार्यक्रम परळीला निश्चित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Pankaja Munde
Shasan Aplya Dari : अखेर 'तारीख पे तारीख'ला ब्रेक; शासन मंगळवारी बीडवासियांच्या दारी

भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटी घेऊन हा कार्यक्रमच नको असा आग्रह धरला. मात्र, कार्यक्रम निश्चित झाला. मागचे दोन महिने कार्यक्रमांचे मुहूर्त बदलत होते. पण मंगळवारी अखेर कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. राज्यात झाले नसेल असे नियोजन करण्याचा प्रयत्न परळीत झाला आहे. मात्र, परळी जसे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे होमपिच तसेच पंकजा मुंडे यांचेही होमपिच आहे.

नव्या समिकरणात या विधानसभा मतदारसंघात दोन भावंडांपैकी कोण निवडणूक लढविणार हा आगामी काळात कळीचा मुद्दा ठरणार आहे. मात्र, कार्यक्रम घेऊन आजघडीला तरी धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात पायाभरणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे असणार का ? हा मागच्या काही दिवसांत चर्चेचा मुद्दा झाला होता. अलिकडे पंकजा मुंडे यांना भाजप (BJP) सर्वत्र टाळत असल्याचे चित्र दिसून आहे.

अगदी पंकजा मुंडे यांनी याबाबत जाहीर वक्तव्य केली आहेत. मग, ओबीसी मेळावा असो, मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक असो पंकजा मुंडे दुरच आहेत. मात्र, परळीतल्या कार्यक्रमाला त्या मुंबईहूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी असलेल्या खास विमानाने नांदेडला आल्या. नांदेडहून हेलीकॉप्टरने हे चार नेते परळीला गोपीनाथगडापोहचले, त्यानंतर ते परळीला कार्यक्रमासाठी दाखल झाले.

(Edited by- Ganesh Thombare)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Pankaja Munde
MLA Ratnakar Gutte News : पंकजाताईंसाठी मतदारसंघ सोडायला तयार..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com