pathri politics : पाथरीच्या राजकीय आखाड्यात खान-दुर्राणी कुस्तीचा नवा अंक! नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीतील वादच लाईव्ह

Pathari City Council politics : साईबाबा यांची जन्मभूमी म्हणून ओळखल असलेल्या पाथरी शहराची ओळख आता राजकीय आखाडा अशी होताना दिसत आहे.
Babajani Durani-Saeed Khan Clashesh In Pathri News
Babajani Durani-Saeed Khan Clashesh In Pathri NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पाथरी शहरात नगर परिषद बैठकीदरम्यान दुर्राणी आणि सईद खान यांच्यात राजकीय संघर्ष उफाळला.

  2. साईबाबांच्या जन्मभूमीमुळे ओळखल्या जाणाऱ्या पाथरीत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

  3. स्थानिक राजकारणात गटबाजी आणि संघर्षामुळे वातावरण तापले आहे.

Prasad Shivaji Joshi : जिल्ह्यातील पाथरी हे शहर साईबाबा यांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून राजकीय कुस्ती, डाव-प्रतिडाव यासाठी ते चर्चेत आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेना (शिंदे) पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे नेते सईद खान यांच्यातील राजकीय कुस्तीचा नवा अंक नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने लाईव्ह दिसून आला.

दुर्राणी यांच्या पस्तीस वर्षाच्या वर्चस्वाला सुरुंग लावलेल्या सईद खान यांना बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आव्हान देण्यात आले. या बैठकीत सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या ठरावास दुर्राणी यांनी आक्षेप घेत मतदान घेण्याची मागणी केली मात्र नगराध्यक्षांनी मागणी फेटाळत ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

पाथरी शहरातील मुस्लीम समाजाचे प्राबल्य असल्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांचे नेतृत्व पुढे आले. 69 वय असलेल्या माजी आमदार दुर्राणी यांनी तब्बल 35 वर्षे पाथरी नगर परिषदेत वर्चस्व अबाधित ठेवले. पर्यायाने संपूर्ण तालुक्याचे राजकारण दुर्राणी यांच्या भोवतीच केंद्रित राहिले. पाथरी विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विजय प्राप्त केलेल्या शिवसेनेच्या हरिभाऊ लहाने यांचा पराभव करत विजय प्राप्त केल्यानंतर दुर्राणी यांनी शरद पवार यांचा विश्वास संपादन केला.

Babajani Durani-Saeed Khan Clashesh In Pathri News
Sanjay Jadhav On Babajani Durani : अरे 17 वर्ष आमदार राहिला अन् स्वीकृत नगरसेवक झालास... 'चुल्लूभर पाणी मे डुब मरो' : ठाकरेंचा खासदार बाबाजानींवर घसरला!

त्यानंतरच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने विधान परिषदेतून आमदारकी मिळवली. मात्र सईद खान या युवा नेत्याने पाथरीच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आणि दुर्राणी यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला. दुर्राणी यांच्याशी संबंधित बाबा टावर या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम अवैध असल्याचा दावा करत सईद खान यांनी उघडपणे विरोध करत तक्रार अर्ज दाखल केले.

याप्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि कन्हैय्या कुमार यांचे जबरी फॅन असलेल्या दुर्राणी यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु विधानसभेच्या तोंडावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शरद पवार की अजित पवार? अशा संभ्रमात असताना अखेर त्यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश करत जिल्हाध्यक्षपद मिळवले.

दुसरीकडे सईद खान यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून नगर परिषद ताब्यात घेतली. आश्चर्य म्हणजे माजी आमदार असलेल्या दुर्राणी यांनी स्वीकृत सदस्य म्हणून स्वत:चीच निवड केली. यामधून नगर परिषदेतील राजकीय संघर्षाचे सुतोवाच केले गेले. जसा कथेतील त्या राजाचा जीव पिंजऱ्यातल्या पोपटात अडकला होता, तसा बाबाजानी दुर्राणी यांचा जीव हा नगरपालिकेच्या सत्तेत आणि राजकारणात अडकला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

दुर्राणी यांनी यापूर्वी नगर परिषद कर्मचारी मधुकर दिवाण, नगरसेवक व पूर्वीचे सहकारी आलोक चौधरी यांना मारहाणही केली होती. मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना हदयविकाराचा झटका आल्याचे प्रकरणही ताजे आहे. तसेच दुर्राणी आणि सईद खान यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचे प्रसंगही घडलेले आहेत. एकूणच पस्तीस वर्षांची सत्ता डोळ्यासमोरून जात असताना वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावरील दुर्राणी यांनी भविष्यातील राजकीय संघर्षाचा स्पष्ट संदेश दिला आहे

Babajani Durani-Saeed Khan Clashesh In Pathri News
Babajani Durani Join Congress News : 'बहुत देर कर दी मेहरबां आते आते' बाबाजानी दुर्राणी यांचा हात आता काँग्रेस के साथ..

FAQs :

1. पाथरी शहर का चर्चेत आहे?
साईबाबांच्या जन्मभूमीमुळे ओळखले जाणारे पाथरी सध्या राजकीय संघर्षामुळे चर्चेत आहे.

2. कोणत्या नेत्यांमध्ये वाद झाला?
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि सईद खान यांच्यात संघर्ष झाला.

3. हा वाद कुठे झाला?
नगर परिषद बैठकीदरम्यान हा वाद उफाळला.

4. या वादाचे कारण काय आहे?
स्थानिक राजकीय गटबाजी आणि सत्ता संघर्ष हे मुख्य कारण आहे.

5. याचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
स्थानिक राजकारणात आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com