Latur Loksabha Constituency : प्रकाश आंबेडकर खरंच लातूरमधून लढणार का? 'असं' आहे राजकीय गणित...

Vanchit Bahujan Aaghadi : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 'वंचित'कडून हालचाली सुरू असल्याची माहिती...
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Latur News: अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 'इंडिया' आघाडीकडून चर्चेत असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे खरंच इथून निवडणूक लढतील का ? असा प्रश्न कार्यकर्त्यांसह मतदारांना पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'वंचित'कडून सर्वेक्षण करण्यासाठी विशेष टीम लातूरला पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

लातूर लोकसभा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून येथे दोन टर्मपासून भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महायुतीचा विजय संकल्प मेळावा नुकताच लातूरात पार पडला. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर विदेशात गेल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकले नाहीत, असे भाजपकडून सांगितले जाते. निलंगेकरांकडून मात्र अद्याप यावर कुठलेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्याची चर्चाही यानिमित्ताने होताना दिसते आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar
Parbhani LokSabha Constituency : अजित पवारांचा विश्वास सार्थ करण्याची राजेश विटेकरांना संधी!

अशावेळी प्रकाश आंबेडकरांची लातूरमधून चर्चा महायुतीसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. त्यातच लातूरमध्ये लवकरच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) 'इंडिया' आघाडीचा मेळावा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पारंपरिक मागासवर्गीय व्होट बॅंक काँग्रेससोबत असल्याने प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी व 'इंडिया' आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आता त्यांनी लातूरमधून लोकसभा लढवावी, यासाठी आंबेडकरवादी जनता उत्सुक आहे. शिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने ते औत्सुक्याचे ठरणार आहे.

लातूर मतदारसंघातील परिस्थिती जाणण्यासाठी 'वंचित'कडून चाचपणी सुरू आहे. त्यांच्या टीमकडून लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी 'इंडिया' आघाडीकडूनही मातब्बर उमेदवार उतरवण्यासाठी तयारी सुरू आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीची मागणी केली असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजप (BJP) व काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार असताना वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त शिक्षणाधिकारी राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांची कोणतीही पूर्वतयारी नसताना व मतदारांसाठी ते नवखे, फारसा संपर्क नसतानाही त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 1 लाख 12 हजार 255 मते घेत 'वंचित'ने आपली ताकद लातूरमध्ये दाखवून दिली होती. सध्या मराठा आरक्षणाचे वारे जोरदार वाहू लागले असले तरी ओबीसी व्होट बँकेचाही त्यांना फायदा होऊ शकतो का ? याचा अभ्यासही केला जात आहे.

मराठा मतदार ऐन निवडणुकीच्या वेळी काय भूमिका घेणार ? हे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणासाठी टोकाचा लढा सुरू आहे, शिवाय प्रकाश आंबेडकर यांनीही मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला आणि भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्यांचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. सध्याचे जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता व प्रकाश आंबेडकर यांची लातूरमधून लढण्यासाठी सुरू असलेली चाचपणी लक्षात घेता ते खंरच लातूरमधून लोकसभा लढवतील का? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना व कार्यकर्त्यांना पडला आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Prakash Ambedkar
Dindori Lok Sabha : भारती पवारांना धक्का देण्यासाठी आता शरद पवार दिंडोरीत काय गुगली टाकणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com