Pralhad Modi-Narendra Modi News, Aurangabad
Pralhad Modi-Narendra Modi News, AurangabadSarkrnama

Pralhad Modi : आधी म्हणाले, मोदी देश कल्याणाचे काम करत आहेत ; मग दिला सरकार घालवण्याचा इशारा..

Buldhana News : देशातील स्वस्त धान्य दुकांनामधून नागरिकांना दिले जाणारे धान्य टप्याटप्याने बंद केले जात आहे.

Aurangabad Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू आणि आॅल इंडिया फेअर प्राईज डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेले प्रल्हादभाई मोदी यांनी बुलडाण्यातील अधिवेशनात मोदी सरकार घालवण्याचा इशारा दिला. Pralhad Modi औरंगाबादेत आपल्या भावाबद्दल अभिमान आणि त्यांच्या राष्ट्रसेवेचे कौतुक करणाऱ्या प्रल्हाद मोदींनी २४ तासांतच भाजपचे सरकार २०२४ मध्ये दिसणार नाही असा, इशारा दिल्याचे एकच चर्चा सुरू झाली आहे.

Pralhad Modi-Narendra Modi News, Aurangabad
Shivsena : उद्धवसेनेचा ठाकरी बाणा, उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी वंदे मातरम सभागृहात प्रवेश..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवेसाठी कधीच कुटुंब सोडले आहे. मतदानासाठीचा पत्ता त्यांचा गुजरातमधला असल्यामुळे तरी किमान त्यांची कुटुंबाशी भेट होते. (Narendra Modi) मोदींनी स्वतःचे जीवन हे राष्ट्रसेवेसाठी वाहून घेतले आहे, ते कुटुंबात कधीच राजकारण आणत नाहीत. (Aurangabad) आज ते ज्या पदावर आहेत, ते स्वकर्तृत्वावर त्यांनी मिळवले आहे, असे गौरवोद्दगार प्रल्हाद मोदी यांनी नुकतेच औरंगाबादेत काढले होते.

बुलडाणा येथील अधिवेशनाला उपस्थितीत राहण्यासाठी तेऔरंगाबादेत आले होते. आज मात्र प्रत्यक्ष बुलडाण्यात स्वस्त धान्य वितरक आणि गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमक पावित्रा घेतल्याचे दिसून आले. देशातील स्वस्त धान्य दुकांनामधून नागरिकांना दिले जाणारे धान्य टप्याटप्याने बंद केले जात आहे.

या विरोधात प्रल्हाद मोदी आवाज उठवत आहेत. बुलडाणा येथील अधिवेशनात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर तोफ डागली. सबका साथ सबका विकास म्हणता, मग गरिबांचे धान्य बंद का करता? असा सवाल करत गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घ्याल तर २०२४ जवळच आहे.

देशातील लाखो स्वस्त धान्य दुकानदार आणि त्यांच्या माध्यमातून जोडल्या गेलेले कोट्यावधी रेशन दुकानदार भाजपची सत्ता खेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा प्रल्हाद मोदी यांनी आपल्या भाषणात दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com