Shivsena : उद्धवसेनेचा ठाकरी बाणा, उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी वंदे मातरम सभागृहात प्रवेश..

Marathwada : वंदे मातरम सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याकडे स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती.
Shivsena Visit Vande Mararm Hall News, Aurangabad
Shivsena Visit Vande Mararm Hall News, AurangabadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Political : औरंगाबाद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच औरंगाबाद येथील वंदे मातरम सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. वंदे मातरम सभागृहासाठी शिवसेना Shivsena अनेक वर्षांपासून लढा देत आली आहे. प्रत्यक्षात मात्र जेव्हा हे सभागृह लोकार्पणासाठी तयार झाले, तेव्हा ठाकरे गटाच्या एकाही नेत्याने निमंत्रण असूनही या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही.

Shivsena Visit Vande Mararm Hall News, Aurangabad
Pankaja Munde : राजकारणात संयम महत्वाचा, तो माझ्याकडे आहे..

त्याचे कारण तिथे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. गद्दारांसोबत बसणे आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने घेतल्यामुळे उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व इतर पदाधिकारी, शिवसैनिकांनी आज वंदे मातरम सभागृहात जाऊन भारत मातेचे पूजन केले. (Aurangabad)

शिंदे गटाच्या मंत्री, आमदारांसोबत न बसण्याची भूमिका शिवसेनेने स्वीकारली असून यापूर्वी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे व्यासपीठावर येताच चंद्रकांत खैरे यांनी व्यासपीठ सोडल्याचे दिसून आले होते. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरे गटामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे.

त्यातच शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदारांनी शिंदेंची सोबत केली. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या सोबत न बसण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या पाठपुराव्याने आकारास आलेल्या वंदे मातरम सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याकडे स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती.

तसेच उद्या आपण वंदे मातरम सभागृहात जाऊन भारत मातेचे पूजन करू असे जाहीर केले होते. त्यानुसार आज चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वंदे मातरम सभागृहात भारत मातेचे पूजन करत या वास्तूची पाहणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com