Marathwada Railway Coach Factory : अखेर ठरलं! मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत डब्बे निर्मितीला मुहूर्त लागणार

Marathwada Railway Coach Factory Latur News : लातूर येथे सुरू होणार्‍या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या आणि सर्वाधिक मागणी असणार्‍या 'वंदे भारत' कोचची निर्मिती होणार आहे.
Pm Narendra Modi Marathwada Railway Coach Factory Latur
Pm Narendra Modi Marathwada Railway Coach Factory LaturSarkarnama
Published on
Updated on

- राम कळगे

लातूर : 11 मार्च | मराठवाड्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम देणारा आणि प्रत्यक्षात रेल्वेचे कोच तयार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लातूर मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत ( Marathwada Railway Coach Factory Latur ) डब्बे तयार होण्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर येत्या 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या हस्ते या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे लोकार्पण होणार आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar ) यांनी याबाबतची माहिती दिली.

Pm Narendra Modi Marathwada Railway Coach Factory Latur
Vishal Patil News : "विश्वजित आमच्या विमानचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण...", भाजप प्रवेशावर विशाल पाटील स्पष्टच बोलले

लातूर येथे उभा राहिलेला मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लातूरकरांच्या आशीर्वादाचे फलित आहे. या कारखान्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या हस्ते 12 मार्च रोजी लोकार्पण होणार आहे. "2017-18 या कालावधीत लातूरच्या जनतेने भाजपला लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह नगरपंचायतीमध्ये भरभरून यश दिले होते. जिल्ह्यात भाजप 'झिरो टू हिरो' ठरली, या यशाच्या पाठबळावर आम्ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडे लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना सुरू करण्याची मागणी केली," असं निलंगेकरांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आमच्या भावना पोहोचवून पाठपुरावा केला आणि रेल्वे बोगी कारखाना मंजूर करून घेतला. लातूरच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला, वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली. या सर्वांचे फलित म्हणूनच लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्याचे मंगळवारी लोकार्पण होत आहे," असं निलंगेकर म्हणाले.

Pm Narendra Modi Marathwada Railway Coach Factory Latur
Tanaji Sawant Vs Uddhav Thackeray : 'मी अयोग्य मंत्री असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही...' ; तानाजी सावंतांनी केला पलटवार!

12 मार्चला सकाळी 8 वाजता आभासी पद्धतीने लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही आभासी पद्धतीनं या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर मान्यवर प्रत्यक्ष कारखानास्थळी उपस्थित राहणार आहेत.

"लातूर परिसरात रोजगार निर्मिती व्हावी, या भागातील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागू नये, यासाठी हा कारखाना व्हावा, हा हेतू होता. तो सफल झाला होत असून, या माध्यमातून जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रेल्वे बोगी कारखान्यास लागणार्‍या इतर साहित्य निर्मितीचे उद्योग जिल्ह्यातच सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. जिह्यातील तरुणांना स्वतः उद्योग उभे करण्यास पोषक वातावरण निर्माण होणार असून, जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे," असा दावा निलंगेकरांनी केला आहे.

Pm Narendra Modi Marathwada Railway Coach Factory Latur
Parbhani Loksabha Constituency : निष्ठावान बंडू जाधवांसाठी उद्धव ठाकरे परभणीला कधी येणार?

'वंदे भारत'ची निर्मिती

लातूर येथे सुरू होणार्‍या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या व सर्वाधिक मागणी असणार्‍या 'वंदे भारत' कोचची तसेच 'वंदे भारत'च्या स्लीपर कोचची निर्मिती होणार आहे. लातूर येथे तयार होणारे कोच देशात व जगात जाणार आहेत. त्यामुळे लातूरचे नाव जगभर होणार आहे. लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. यासाठी एकूण 350 एकर क्षेत्र घेण्यात आले असून, यापैकी 120 एकरवरील बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.

पहिल्या फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य आहे, तर दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेज म्हणजे वर्षाला 700 कोच निर्मिती करणाऱ्या अवाढव्य कारखान्याचे पहिल्या टप्प्यात 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. लातूर येथील बहुचर्चित कोच फॅक्टरी 2020 पासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीला येथे मेट्रोचे डब्बे तयार होणार होते. मात्र, त्यानंतर 'वंदे भारत'चे डब्बे बनवण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली.

R

Pm Narendra Modi Marathwada Railway Coach Factory Latur
Sharad Pawar News: ED हा भाजपचा सहकारी पक्ष; शरद पवारांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com