Punjab Dakh police complaint : पंजाबराव डखांवर थेट पोलिस तक्रार! शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप; भीमराव धोंडे आक्रमक

Former MLA Bhimrao Dhonde files a police complaint against Punjab Dakh, alleging misleading weather forecasts caused losses to farmers in Maharashtra : हवामान अंदाजावर विश्वास ठेवून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे पावसाअभावी नुकसान झाल्याचा दावा; डख यांच्या अंदाजांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची माजी आमदारांची मागणी
Punjab Dakh
Punjab DakhSarkarnama
Published on: 
Updated on: 

Punjab Dakh farmer complaint : मराठवाड्यासह राज्यात दुष्काळ आहे, पिकं करपून गेली, जनावरांना प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही. सरकारकडून अद्याप ठोस मदत मिळालेली नाही.

अशातच बीड जिल्ह्यातील आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याविरोधात थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण पाऊसच न पडल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान अभ्यासक म्हणून डख यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप धोंडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

माजी आमदारांनी केलेल्या या तक्रारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. पंजाबराव डख हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या (Maharashtra) शेतकऱ्याची फसवणूक करत असून त्यांच्या चुकीच्या अंदाजामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न धोंडे यांनी केला आहे. पंजाबराव डखांना हवामानाबद्दल शिक्षण नाही, अभ्यास नसताना ते चुकीचा अंदाज सांगतायेत, असाआरोपही धोंडे यांनी तक्रारीत केला.

पंजाबराव डख यांना हवामानाबद्दल शिक्षण नाही ते अभ्यास नसताना चुकीचा अंदाज सांगून शेतकऱ्यांची (Farmer) दिशाभूल करत असतात. आज पाऊस येईल, उदया येईल मात्र पाऊसच पडत नाही. शेतकरी त्यांच्या हवामान अंदाजवर विश्वास ठेवून शेतता पेरणी करतात, मात्र त्यांचा अंदाज फोल ठरतो आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत. त्यामुळे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी तक्रार अर्जाद्वाऱे आष्टी पोलीसांकडे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे.

Punjab Dakh
Eknath Shinde 5500 Crore Fund : एकनाथ शिंदेंच्या साडेपाच हजार कोटींच्या निधीवरून फडणवीसांकडे तक्रार! थेट ACB चौकशीची मागणी; महायुतीत खळबळ

महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे पावसाचे अंदाज वेळोवेळी चुकल्याच्या घटनांवरून शेतकऱ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चा व टीका होत असते. यावर्षी डखांनी पावसाच्या अंदाजासह मान्सूनच्या काही टप्प्यांतील अंदाज अपेक्षेप्रमाणे न ठरल्याने त्यांच्या विश्वासाार्हतेवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. हवामानाच्या अंदाजावर आधारित पेरणी किंवा इतर नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकीच्या अंदाजामुळे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जाते.

Punjab Dakh
Delimitation Bill : अहिल्यानगरला तिसरा खासदार मिळणार? डिलिमिटेशनच्या नव्या फॉर्म्युल्यात श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा

शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांची गय करू नका!

हवामान अंदाजाच्या नावाखाली पंजाबराव डख यांनी केलेल्या भाकितांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होऊन अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याच्या प्राप्त तक्रारींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत भीमराव धोंडे यांनी पोलीस निरीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. शेतकऱ्यांची फसवणूक आणि आर्थिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा कायम सुरू राहील, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.