Ahilyanagar third Lok Sabha constituency : अहिल्यानगरला तिसरा खासदार मिळणार? डिलिमिटेशनच्या नव्या फॉर्म्युल्यात श्रीरामपूरची चर्चा; 48 वरून महाराष्ट्रात 72 जागा!

Maharashtra may get 72 Lok Sabha seats under the proposed delimitation formula. Will Ahilyanagar gain a third constituency, with Shrirampur in focus? लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढवण्याच्या केंद्राच्या प्रस्तावामुळे महाराष्ट्राचा राजकीय नकाशा बदलण्याची शक्यता; अहिल्यानगरमध्ये शिर्डी आणि दक्षिण नगरनंतर तिसऱ्या मतदारसंघाचे गणित, महिलांना 33 टक्के आरक्षणाचा मार्ग
Ahilyanagar third Lok Sabha constituency
Ahilyanagar third Lok Sabha constituencySarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Lok Sabha seats increase : राज्यात लोकसभेच्या जागा 48 आहेत. प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास, 50% वाढीनुसार 24 नव्या जागा वाढतील. म्हणजेच महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण जागा 72 होतील.

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या शिर्डी आणि दक्षिण नगर, असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. जर हे विधेयक संसदेत मंजूर झाले, तर सुत्रानुसार त्यात एका मतदारसंघाची वाढ होऊ शकते. त्यात हा मतदारसंघ उत्तरेत देण्याचे ठरले, तर श्रीरामपूरचे नाव पुढे येईल, असे संकेत मिळत आहेत.

या प्रस्तावित विधेयकात महिला आरक्षण (33%) आरक्षण आहे. त्यामुळे 72 पैकी सुमारे 24 जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात. तसे झाल्यास अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात तीनपैकी एक महिला खासदार असू शकतो. तसेच सध्या 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात आणखी दोन विधानसभा मतदारसंघ वाढीची शक्यता आहे. विधानसभेतही महिलांचा टक्का वाढू शकतो.

डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास, महाराष्ट्रातील राजकीय नकाशा बदलणार आहे. मतदारसंघ देखील प्रभावित होणार आहे. सध्याच्या जागा 48 जागाहून, नव्याने 24 जागा वाढून 72 लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघ होतील. जर केवळ 50 टक्के सूत्राऐवजी 2011च्या जनगणनेतील लोकसंख्येचा निकष पूर्णपणे लागू झाला, तर महाराष्ट्राच्या जागा 79 पर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते.

Ahilyanagar third Lok Sabha constituency
Manoj Jarange Supari Remark : 'जरांगे पाटील कुणाची तरी सुपारी घेऊन काम करताहेत!' योगेश कदमांचा थेट हल्ला; 500 कोटींच्या आरोपांवरून खळबळ

अहिल्यानगर पाठोपाठ मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरी भागांबरोबरच ग्रामीण जिल्ह्यांमध्येही मतदारसंघांची संख्या बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच 72 पैकी सुमारे 24 जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात, ज्यामुळे राज्यातील महिलांचे संसदीय प्रतिनिधित्व ऐतिहासिक पातळीवर पोहोचू शकते.

Ahilyanagar third Lok Sabha constituency
Shirdi police bribery case : वाळू वाहतुकीचा दरमहा 40 हजारांचा हप्ता! लाच घेताच हवालदाराची ACB पथकाशी रस्त्यावर झटापट; व्हिडीओ व्हायरल

डिलिमिटेशनसाठी संख्याबळ

लोकसभेत सत्ताधारी रालोआ आघाडीकडे भाजपसह 320 सदस्य आहेत. विधेयक संमत करण्यासाठी 360 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. शरद पवार राष्ट्रवादी आठ, द्रमुक 22, वायएसआर काँग्रेस चार यांचा पाठिंबा मिळाला, तर संख्याबळ 354पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच केंद्र सरकारला आणखी सहा सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.