Radhakrishna Vikhe : जरांगेंवर बोलण्यास विखेंचा नकार, विषयच बदलला...; उद्या आंतरवालीतील बैठक निर्णायक ठरणार?

Radhakrishna Vikhe : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा आणि आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Vs Radhakrishna Vikhe Patil
Manoj Jarange Vs Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा आणि आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास स्पष्टपणे टाळाटाळ केली.

आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी टंचाईच्या परिस्थितीबाबत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तसेच मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, यावर प्रतिक्रिया देणे विखे पाटील यांनी टाळले.

Manoj Jarange Vs Radhakrishna Vikhe Patil
Pune Liquor Ban: हायकोर्टानं खडसावल्यानंतर पुणे जिल्ह्यातील १२ दिवसांची दारुबंदी मागे; आता फक्त 'या' दिवशीच...; कोर्टात नेमकं काय घडलं?

“आज टंचाईची बैठक आहे. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, मात्र आज टंचाईची बैठक असल्यामुळे टंचाईवरच बोलू,” असे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करण्याचे टाळले. दरम्यान, उद्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक होणार असल्याने या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Vs Radhakrishna Vikhe Patil
Eknath Khadse: शिवसेना-भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये खडसेंना मंत्रीपदं देण्यावरुन झाला होता ड्रामा; प्रमोद महाजनांनी असा फिरवला गेम

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे होणाऱ्या संभाव्य कूचच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, या संपूर्ण घडामोडींवर मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी मौन बाळगल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com