Raj Thackeray : शरद पवारांचं जंतरमंतर फार थोड्या लोकांना कळते, तीन वर्षापूर्वीची पोस्ट करत राज ठाकरेंचे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर भाष्य!

Sharad Pawar Party News : शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडली आहे. राज्य आणि देशपातळीवर सरू असलेल्या या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
mns Chief Raj Thackeray on Sharad Pawar
mns Chief Raj Thackeray on Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delimitation Bill : केंद्रातील मोदी सरकार आणू पाहत असलेल्या डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण बीलाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर आमदार तथा पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हान यांनी पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सांगितले.

शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडली आहे. राज्य आणि देशपातळीवर सरू असलेल्या या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे होऊन एक गट राज्याच्या सत्तेत गेला तेव्हा म्हणजेच २ जूलै २०२३ रोजी केलेली आपली जुनी पोस्ट राज ठाकरे यांनी संदर्भ म्हणून परत टाकली. शरद पवारांनी डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेबद्दल आपल्याला आश्चर्य वाटले नाही, असा सूर लावत त्यांनी शरद पवार यांचं जंतरमंतर हे थोड्याच लोकांना कळतं, असा टोलाच राज ठाकरे यांनी लगवाला आहे.

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा हालचाली वेगवान केल्या आहेत. विशेष म्हणजे, यावेळी लोकसभेतील खासदारांची संख्या ५० टक्क्यांनी वाढविणे आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करणे, असा सरकारचा प्रस्ताव आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP-SP) भूमिका डिलिमिटेशन विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याची आहे. मात्र, पक्षाने संसदेतील अंतिम निर्णय अद्याप विधेयकाचा मसुदा तपासल्यानंतर घेण्याचे स्पष्ट केले आहे.

mns Chief Raj Thackeray on Sharad Pawar
BJP Bhandara : 'महायुती सरकारने आमदार खासदारांना महाराष्ट्र लुटायला मोकळीक दिलेय...'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी 27 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदारसंघ पुनर्रचना ही घटनात्मक प्रक्रिया असून ती कधी ना कधी होणे आवश्यक आहे. तर पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र अधिक सावध भूमिका मांडली आहे.

mns Chief Raj Thackeray on Sharad Pawar
BJP News: विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या बड्या नेत्याला 'जोर का झटका'; उच्च न्यायालयाकडून थेट आमदारकीच रद्द

या घडामोडीवर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. २ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे.

mns Chief Raj Thackeray on Sharad Pawar
NCP Politics : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीचे खरे कारण समोर

तीन वर्षापूर्वी केलेली राज ठाकरे यांची ही पोस्ट..

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झालो. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी सज्ज होईलच! तसंच महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.

ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे याची खात्री असल्यामुळे हा सगळ्यांचं सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरू राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी तेव्हा उपस्थित केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.