Shivsena UBT News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेल्या भेटीने राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. कोणी म्हणतो, राज्यपाल नियुक्त आमदारकी राजपुत्र अमित ठाकरे यांना देण्यासाठी ही भेट होती, तर कोणी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युतीची यावेळी चर्चा झाल्याचा दावा केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी देखील या भेटीची दखल घेत त्यावर भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी शिवाजी पार्कवर एक चागंला कॅफे झाला आहे, तिथे मोठे लोक काॅफी प्यायला जातात, अशा शब्दात या भेटीवर खोचक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता शिवसेनेचे दुसरे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी या भेटी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर षटकारच लगावला. महाराष्ट्रात ठाकरेंशिवाय पर्याय नाही का? यावर 'ओरिजनल'असे म्हणत राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या डुप्लीकेट ठाकरे ठरवून टाकले. भाजपला ओरिजनल ठाकरेंशिवाय पर्याय नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे हेच ओरिजनल असल्याचा दावा खैरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस हे फार बुद्धीवान आहेत. महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येऊ शकतात? या चिंतेतूनच फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री, आमदार सध्या बेचैन आहेत. अशावेळी एकनाथ शिंदे पुन्हा उठाव करू शकतात,ही शक्यता लक्षात घेऊनच भाजप नवा पर्याय शोधत आहे, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला.
भाजपला ओरिजनल ठाकरे यांच्याशिवाय पर्यायच नाही, याचा पुनरुच्चार करत खैरे यांनी राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत खैरे हे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. गेली 35-40 वर्ष ते पक्षात कार्यरत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मी सच्चा शिवसैनिक असल्याचा दावा करत पक्षाशी कधीही गद्दारी करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ देणार, असं खैरे सातत्याने सांगतात.
शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक, दोन वेळा आमदार, राज्यात मंत्री आणि सलग चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे शिवसेनेत झालेल्या बंडाच्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. निष्ठेचे फळ म्हणून त्यांना सहाव्यांदा संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. पक्षाला जिल्ह्यात गळती लागली तेव्हा हात जोडून, साष्टांग दंडवत घालून त्यांनी कोणीही कुठे जाऊ नका, पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा चांगले दिवस येतील, अशी साद घातली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.