Parbhani NCP News : परभणीत भाजपच्या धक्कातंत्राने विटेकरांची विकेट पडणार?

Loksabha Election : महायुतीच्या जागावाटपात भाजपने नव्या चेहऱ्याला संधी देत मैदानात उतरवण्याची तयारी केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Rajesh Vitekar
Rajesh VitekarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : पक्षातील चर्चेत नसलेला नेता किंवा अगदी राजकारणाच्या वर्तुळाबाहेरील व्यक्तिमत्वास थेट पक्षाची उमेदवारी देऊन स्वपक्षातील, तसेच विरोधी पक्षांनाही धक्का देणारे तंत्र भारतीय जनता पक्षात अनेक वर्षांपासून विकसित आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना पक्षाने राज्यसभेचे खासदारही केले आणि त्यांना थेट मंत्रिपदही बहाल केले. पक्षाच्या हे धक्कातंत्र निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी सुखावह असले तरी त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उत्साही नेते व कार्यकर्त्यांसाठी धडकी भरवणारे आहे. (Rajesh Vitekar's wicket Will fall due to BJP's shock technique in Parbhani?)

परभणी लोकसभा मतदारसंघाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसला पूर्वीपासूनच खूप अपेक्षा आहेत. अजित पवार हे शिवसेना-भाजप महायुतीच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. विद्यमान खासदार संजय जाधव हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने परभणी लोकसभा मतदारसंघ महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा शिवसेनेला मिळणार हे स्पष्ट झाले. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनी शिवसेनेच्या संजय जाधव यांना जोरदार लढत दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajesh Vitekar
BJP Leader In Solapur : नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा; भाजप नेत्यांची उद्यापासून शहरात मांदियाळी...

आता पक्षफुटीनंतर राजेश विटेकर यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार) मिळण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे क्रीडामंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नेमणुका करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकते माप देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून पक्षाने राजेश विटेकर यांची नेमणूक केली. या सर्व घटनाक्रमामुळे महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळेल आणि महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर हेच असतील, असे जवळपास स्पष्ट होते. केवळ चिन्ह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ असेल की भारतीय जनता पक्षाचे कमळ असेल? याबाबत संभ्रम होता. परंतु परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळण्याची औपचारिक घोषणा बाकी असतानाच महायुतीच्या जागावाटपात भाजपने नव्या चेहऱ्याला संधी देत मैदानात उतरवण्याची तयारी केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Rajesh Vitekar
Pawar-Modi Solapur Tour : शरद पवार अन्‌ नरेंद्र मोदी एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर; राज्याला उत्सुकता!

आणखी धक्कादायक बाब म्हणजे हा चेहरा संघपरिवारातील पदाधिकारी असण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार संजय जाधव यांना प्रतिस्पर्धी म्हणून उमेदवार देताना नवा चेहरा, उच्चविद्याविभूषित, समाजाच्या सर्व स्तरांवर जनसंपर्क आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रखर हिंदूत्व या निकषांचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. असे झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व विटेकरांनी केलेल्या तयारीवर पाणी पडू शकते.

Edited By : Vijay Dudhale

R...

Rajesh Vitekar
Parbhani LokSabha Constituency : अजित पवारांचा विश्वास सार्थ करण्याची राजेश विटेकरांना संधी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com