Vilas Ghule Case : "सौरव सोनवणेचं नाव मागे घे, नाहीतर..."; विलास घुले प्रकरणात रमेश घुलेंना जीवे मारण्याची धमकी!

Vilas Ghule case update Maharashtra : विलास घुले प्रकरणात सौरव सोनवणे यांचे नाव मागे घेण्याची धमकी देत रमेश घुले यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. या प्रकरणातील संपूर्ण घडामोडी वाचा.
Vilas Ghule Case
Vilas Ghule Case Sarkarnama
Published on
Updated on

Beed crime news : केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जून रोजी विलास घुले या तरुण हॉटेल चालकाचा आठ ते दहा जणांच्या टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण तापले होते.

खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याचे नाव आरोपींना मदत केलेल्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने त्याच्या अटकेसाठी विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी मोठे आंदोलनही उभे केले. पोलिसांनी मात्र पुरावे सापडल्यास कोणालाही सोडणार नाही अशी भूमिका घेत तपास केला.

Vilas Ghule Case
CJP News : कॉकरोच जनता पार्टी अन् सरकारमध्ये तोडगा! मध्यरात्रीच्या बैठकीनंतर आणखी एका मागणीला हिरवा कंदील

पोलिसांच्या तपासात अद्याप खासदार पुत्र सौरव सोनवणे याच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे न आढळल्याने कारवाई पुढे सरकलेली नाही. दुसरीकडे विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी मात्र राजकीय दबावामुळे सौरव सोनवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान सौरव सोनवणे याचे नाव गुन्ह्यातून मागे घे, नाहीतर तुला संपवून टाकू अशी धमकी अज्ञातांकडून आपल्याला मिळाल्याचा आरोप रमेश घुले यांनी केला आहे.

या संदर्भात त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. 'भावाच्या खुनाविषयीची तक्रार मागे घे आणि सौरभ सोनवणेचे नावही मागे घे, नाहीतर जिथे दिसशील तिथे संपवून टाकू', अशी धमकी अज्ञात गुंडांनी आपल्याला मध्यरात्री दिल्याचे रमेश घुले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Vilas Ghule Case
MHT CET Scam: महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ : CET परीक्षेत 99 पर्सेंटाईल मिळवून देतो, आमची सेटिंग; खासगी संस्थाचालकाची धक्कादायक ऑडिओ क्लीप व्हायरल

25 जुलै रोजी ही तक्रार देण्यात आली असून 24 जुलै रोजी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास घरातील सर्व जण गाढ झोपेत असताना अज्ञात दोन व्यक्तींनी घराचा दरवाजा जोरात वाजवला. दरवाजा उघडताच समोर उभ्या असलेल्या दोन संशयित तरुणांनी मला थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

सौरव सोनवणे याचे नाव गुन्ह्यातून मागे घे, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. जिथे दिसशील तिथे संपवून टाकू, अशी धमकी देत अज्ञात आरोपी तिथून पळून गेले, असे रमेश घुले यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात तरुणांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी रमेश घुले यांनी केली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com