Ramrao Wadkute News : सुरेश वरपूडकरांनी मला बळजबरीने राजकारणात आणले; नोकरी सोडायला लावून कारखान्याचे डायरेक्टर केले!

Suresh Warpudkar News : मी समाजकार्यात रमलो होतो, पण सुरेश वरपुडकरांनी मला बळजबरीने राजकारणात आणले. चांगली नोकरी सोडायला लावली अन् कारखान्याचे डायरेक्टर केले.

suresh Warpudkar, ramrao vadkute
suresh Warpudkar, ramrao vadkute Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli Politics News : मी समाजकार्यात रमलो होतो, पण सुरेश वरपुडकरांनी मला बळजबरीने राजकारणात आणले. चांगली नोकरी सोडायला लावली अन् कारखान्याचे डायरेक्टर केले. कारखान्याच्या निवडणुकीत ऐनवेळी त्यांची अडचण झाली. मला त्यांनी बोलावून घेत तुझ्याकडे जातीचे सर्टीफिकेट आहे का? असे विचारले. तुम्हाला माझी जात माहित नाही का? असा उलट प्रश्न त्यांना केला. प्रमाणपत्र आणला आणि त्यांनी मला डायरेक्टर पदाचा अर्ज भरायला लावला.

मी म्हणालो, माझी नोकरी तर ते म्हणाले जाऊ दे, आपण पाहू. माझ्या आयुष्यात वरपुडकरांनी दिलेला मला हा पहिला झटका होता, अशी मिश्किल टिप्पणी राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी केली. भविष्यात वरपुडकरांकडून बरचं शिकायला मिळाले, पुढेही त्यांनी मला बरेच झटके दिले. पण ते माझ्या फायद्याचे ठरले आणि मी राज्यसभेपर्यंत पोहचू शकलो, असेही वडकुते म्हणाले.


suresh Warpudkar, ramrao vadkute
Maharashtra Politics Update: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का; दोन नेत्यांच्या राजीनाम्यानं खळबळ

या देशाचे जाणते राजे शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यावर खूप प्रेम केले, मला त्यांनी अनेक पदं दिली. पण काही कारणामुळे मी त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये गेलो. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी एक सांगितले, एवढ्या मोठ्या माणसाला सोडून तुमच्याकडे आलोयं, याची फक्त जाणीव ठेवा. पाच वर्षात अनेक संधी आल्या पण त्यांनी फक्त माझे लक्ष आहे, असे सांगितले, पण दिले काही नाही. पण भाजपसारख्या पक्षात प्रत्येक कार्यकर्त्यावर वरिष्ठांचे लक्ष असते. योग्यवेळी त्याला न्याय दिला जातो.


suresh Warpudkar, ramrao vadkute
Ashok Kharat Case : तुळजापुरात पाऊल ठेवताच सुनील तटकरेंचे भोंदूबाबा खरात प्रकरणी मोठे वक्तव्य; थेट म्हणाले,'विकृत मनोवृत्तीला ठेचून....'

खरेतर मी विधानपरिषद मागितली होती, पण मला राज्यसभा मिळाली. राज्यसभा मिळाली नसती तर मे मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर माझा डोळा होता, अशी प्रांजळ कबुलीही वडकुते यांनी दिली. राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. वरपुडकरांकडून मला खूप काही शिकायला मिळाले, याचा पुनरुच्चारही वडकुते यांनी केला.


suresh Warpudkar, ramrao vadkute
Ashok Kharat Controversy : रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच उद्धव ठाकरेंची पाहिली प्रतिक्रिया; म्हणाले,' भोंदूबाबाच्या भक्तांवर...'

अजित पवारांचा विरोध तरी सही केली..

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)असताना विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांनी आपल्याला छगन भुजबळ यांच्या उमेदवाराला सूचक, अनुमोदक म्हणून सही द्यायची नाही, असा आदेश मला दिला होता. तर दुसरीकडे भुजबळ साहेबांनी फोन करून माझ्या उमेदवारांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक म्हणून सही करा, असा निरोप पाठवला. मी मोठ्या संकटात सापडलो, पण एका जवळच्या कार्यकर्त्याला बोलावून घेतले. त्याला सांगितले भुजबळ साहेबांच्या उमेदवाराच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही कर. तर तो म्हणाला, पण अजितदादांनी आपल्याला नाही सांगितले.


suresh Warpudkar, ramrao vadkute
Ashok Kharat Controversy : रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच उद्धव ठाकरेंची पाहिली प्रतिक्रिया; म्हणाले,' भोंदूबाबाच्या भक्तांवर...'

मी त्याला म्हणालो, ते आधी नाही म्हटले, पण नंतर मला सही दे म्हणून सांगितले. त्याला ते पटले आणि त्याने सही केली. त्यानंतर काय घडणार? हे मला माहित होते. अजितदादा संतापले, त्यांनी कुठे आहे रामराव बोलवा त्याला असे फर्मान सोडले. पण काही दिवस मी त्यांच्यासमोर गेलोच नाही. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही मिनिटं शिल्लक असताना विधानभवनात गेलो. तिथे मला अजितदादांनी झापझाप झापले. मी म्हणालो, दादा काय झाले, ते म्हणाले, मी नाही सांगितले तरी तू सूचक म्हणून सही कशी केली. आता शरद पवारांना सांगतो, राज्याचा कारभार याच्याच हातात द्या, असा किस्साही वडकुते यांनी यावेळी सांगितला.


suresh Warpudkar, ramrao vadkute
Ashok Kharat CDR revelations: खरातचे एकनाथ शिंदेंना कॉल, अंधारेंच्या आरोपावर उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'ही वृत्ती...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com