Ranajagjitsinha Patil : कुस्तीच्या आखाड्यात राणा पाटलांचा काँग्रेसच्या चव्हाणांवर डाव ?

Madhukarrao Chavan : धाराशिवमधील काँग्रेसचा तरूण नेते भाजपात जाण्याच्या चर्चा
Ranajagjitsinha Patil
Ranajagjitsinha PatilSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना आव्हान दिले. सलग तीन वेळा आमदार झालेल्या मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलवले. आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या माजी आमदारासोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यात मात्र राणाजगजीतसिंह पाटील यांनी कधीच कमीपणा ठेवला नाही.

आता जिल्ह्यातील एक नेता भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. त्यांच्यासमवेत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) यांचे पुत्र काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण यांचे नाव जोडले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. नळदुर्ग येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील व श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण हे दोन नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Ranajagjitsinha Patil
Honey Trap News : पोलिस मित्राने रचलेल्या 'हनी ट्रॅप'मध्ये अभियंता अडकला; अन्...

या दोन नेत्यांचे एकत्रित येणे हे तुळजापूर तालुक्याच्या राजकारणाला येणार्‍या काळात वेगळी कलाटणी देणारे ठरणार का? याबाबत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नळदुर्ग येथील श्री खंडोबा यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितीच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. बक्षीस वितरणासाठी राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsingh Patil) आणि काँग्रेसचे युवा नेते सुनील चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Ranajagjitsinha Patil
Nashik Politics : आघाडीची गाडी नाशिकमध्ये अडलेलीच तर; दिंडोरीत सापडेना पर्याय

या दोन नेत्यांचे संयोजकांनी एकत्रितरित्या वाजतगाजत स्वागत केले. याठिकाणी बराचवेळ या दोन नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही केल्या. दरम्यान, दोघांच्या हस्ते शेवटची मानाची कुस्तीही लावण्यात आली. या दोन नेत्यांचे एकत्रित येणे हे आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे ठरणार का? याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील एक युवा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांचे एकत्रित येणे हा योगायोग म्हणता येणार नाही. कुस्ती आखाडा समितीने या दोन नेत्यांना निमंत्रित केले होते, हे बरोबर आहे. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत व येणार्‍या काळात होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुका पाहता या दोघांमधील वाढती जवळीक राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमाला सुनील चव्हाण यांची अनुपस्थिती सगळ्याना खटकली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Ranajagjitsinha Patil
Prakash Ambedkar News : '...तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा!'; आंबेडकर असं का म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com